शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्ह्यांचा नवा फंडा : हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचे रॅकेट, तरुण, डॉक्टर ठरले बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 06:14 IST

Honeytrap : तरुणींच्या व्हाॅट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलमध्ये अडकून राज्यातील अनेक कॉलेज तरुण, व्यावसायिक व विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

- अरुण वाघमोडेअहमदनगर - सुंदर तरुणी संपर्कात आली तर बहुतांश पुरुषांचे मन विचलित होते. याच मानसिकतेचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन फसवणुकीचा नवीनच फंडा शोधून काढला आहे. तरुणींच्या व्हाॅट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलमध्ये अडकून नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक कॉलेज तरुण, व्यावसायिक व विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून फसवणूक झाल्याच्या तीन ते चार तक्रारी आठवड्यातून सध्या येथील सायबर पोलिसांत दाखल होत आहेत. सुंदर फोटो असलेली तरुणी प्रथम सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात येते. चॅटिंगच्या माध्यमातून ती मैत्री वाढविते. त्यानंतर ती तरुणी व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हिडीओ कॉल करते.व्हिडीओ कॉल सुरू असतो तेव्हा ती तरुणी स्क्रीनवर संपूर्ण शरीर दाखवून स्वत:चे कपडे उतरविते. यावेळी समोरील व्यक्तीलाही तसेच करायला सांगते. याच वेळी समोरील तरुणी व तिचे साथीदार स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून नग्न झालेल्या तरुणाचा व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतात. त्यानंतर त्या व्यक्तीकडे पैशांची मागणी केली जाते. अशा प्रकारे फसवणूक केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.फसवणूक करणाऱ्या टोळ्या परप्रांतीयव्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळ्या या झारखंड, नोयडा, मध्य प्रदेश या परिसरातील असल्याची सायबर पोलिसांची माहिती आहे. अशा फसवणुकीसंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतरही तांत्रिक अडचणींमुळे या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य होत नाही. अशी येते ‘ती’ तरुणी संपर्कातसायबर गुन्हेगारांच्या टोळ्या फसवणुकीसाठी सोशल मीडियावर टार्गेटचा शोध घेतात. प्रथम फेसबुकवरून अकाउंटधारकाला अनोळखी तरुणीची फ्रेण्डरिक्वेस्ट येते. ही रिक्वेस्ट स्वीकारली की, ती मेसेंजरच्या माध्यमातून संपर्कात येते. कधी चॅटिंग तर कधी मेसेंजरच्या माध्यमातून कॉल असा सिलसिला सुरू होतो. नंतर ती व्हाॅट्सअ‍ॅप नंबर मागते. त्यानंतर व्हाॅट्सअ‍ॅपवरून कॉल करून अडकविले जाते.फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेण्डरिक्वेस्ट स्वीकारू नये. प्रत्येकाने आपले फेसबुक अकाउंट प्रायव्हेट करावे. अनोळखी व्यक्तीने संपर्क केला तर त्याला आपली कुठल्याच प्रकारची वैयक्तिक माहिती देऊ नये.- प्रतीक कोळी, पोलीस उपनिरीक्षक सायबर पोलीस ठाणे, अहमदनगर 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhoneytrapहनीट्रॅप