लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : जुना वाद उफाळून पुतण्याने कुऱ्हाडीने मारहाण करून काकाची हत्या केल्याची घटना रिसोड तालुक्यातील हिवरापेन येथे ७ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. साहेबराव गुलाबराव सरनाईक असे मृतकाचे नाव असून, योगेश गणपतराव सरनाईक असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.शिरपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाºया हिवरापेन येथे मृतक साहेबराव सरनाईक व त्याचा पुतण्या योगेश सरनाईक यांच्यात जुना वाद होता. या वादावरून ७ जून रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान बोलाचाल झाली. पाहता-पाहता दोघांमध्ये हाणामारी होत पुतण्या योगेशने काका साहेबराव सरनाईक यांच्यावर कुऱ्हाडीचे वार केले. यामध्ये साहेबराव सरनाईक हे गंभीर जखमी होऊन जागेवरच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार समाधान वाठोरे, पोलीस उपनिरीक्षक शरद साठे, बीड जमादार विनोद चव्हाण, महादेव चव्हाण, विनोद जायभाये यांनी घटनास्थळावर जाऊन योगेंद्र सरनाईक यास अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
जुन्या वादातून पुतण्याने केली काकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 16:25 IST
साहेबराव गुलाबराव सरनाईक असे मृतकाचे नाव असून, योगेश गणपतराव सरनाईक असे आरोपीचे नाव आहे.
जुन्या वादातून पुतण्याने केली काकाची हत्या
ठळक मुद्देसाहेबराव सरनाईक व त्याचा पुतण्या योगेश सरनाईक यांच्यात जुना वाद होता.दोघांमध्ये हाणामारी होत पुतण्या योगेशने काका साहेबराव सरनाईक यांच्यावर कुऱ्हाडीचे वार केले.यामध्ये साहेबराव सरनाईक हे गंभीर जखमी होऊन जागेवरच ठार झाले.