शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

दीपिका पादुकोणच्या मॅनेजरच्या घरी एनसीबीचा छापा; मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडले

By हेमंत बावकर | Updated: October 27, 2020 20:32 IST

Deepika Padukone Drug enquiry: गेल्याच महिन्यात दीपिकाची एनसीबीने चौकशी केली होती. एका व्हायरल चॅटमुळे दीपिकाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली होती. 

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर असलेली करिश्मा प्रकाशच्या घरी एनसीबीचा छापा टाकला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडले आहे. महत्वाचे म्हणजे गेल्याच महिन्यात दीपिकाची एनसीबीने चौकशी केली होती. एका व्हायरल चॅटमुळे दीपिकाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली होती. 

लॉकडाऊनमध्ये दीपिका सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह होती पण ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर ती ना इन्स्टाग्रामवर ना ट्विटरवर कुठेच सक्रिय दिसली नाही. एनसीबीच्या चौकशीनंतर ती एकही पोस्ट सोशल मीडियावर केली नव्हती. आता मॅनेजरच्याच घरी मोठा साठा सापडल्याने दीपिका पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

करिश्मा प्रकाश छाप्यानंतर गायब झाली असून तिला हजर राहण्याची नोटीस एनसीबीने बजावली आहे. तिच्या मुंबईतील घराच्या दारावर ही नोटीस चिकटविण्यात आली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्जच्या सेवनावर करिश्माचाही गेल्या महिन्यात एनसीबीने चौकशी केली होती. तिच्यासोबत दीपिका पदुकोण, रकुल प्रित सिंग, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनाही चौकशीला बोलविण्यात आले होते. दीपिका, श्रद्धाचे व्हॉट्सअॅप चॅटमध्ये नाव आले होते. 

करिश्मा प्रकाशला एनसीबीने उद्या चौकशीसाठी बोलावले आहे. 

दरम्य़ान, करिश्माच्या घरी एनसीबीने आज छापा मारल्याची चर्चा आहे. तिच्या घरातून अज्ञात प्रमाणावर ड्रग्ज सापडले आहे. करिश्मा फरार असून तिची चौकशी केली जाणार आहे. 

दीपिकाचा सिनेमा येणारप्रभास आणि दीपिकाची जोडी एक सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. पण स्वतः दीपिकाने काही महिन्यांपूर्वीच चित्रपटाची घोषणा केली होती.ती म्हणाली होती की, साऊथ सुपरस्टारबरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे. दीपिका पादुकोण गोव्यात शकुन बत्राच्या अनटायटल्ड सिनेमाचं शूटींग गोव्यात करते आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अनन्या पांडे दिसणार आहेत. 

टॅग्स :Deepika Padukoneदीपिका पादुकोणDrugsअमली पदार्थSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो