शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कॉमेडियन भारती सिंह, पती हर्षविरुद्ध एनसीबीने दाखल केले २०० पानी आरोपपत्र; अडचणी वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 06:52 IST

नोव्हेंबर २०२० मध्ये भारती व हर्षच्या घरी व कार्यालयात ८६.५० ग्रॅम गांजा सापडल्याने एनसीबीने दोघांनाही ताब्यात घेतले. 

मुंबई : कॉमेडियन भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्यावर ड्रग्सप्रकरणी एनसीबीने २०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. २०२० मध्ये त्यांना एनसीबीने अटक केली होती. त्यांचा जामीन मंजूर झाल्याने ते सध्या कारागृहाबाहेर आहेत. भारती व हर्षने गांजा बाळगल्याचा व त्याचे सेवन केल्याचा संशय आल्याने एनसीबीने त्यांना २०२० मध्ये अटक केली. त्यामुळे मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला होता.

नोव्हेंबर २०२० मध्ये भारती व हर्षच्या घरी व कार्यालयात ८६.५० ग्रॅम गांजा सापडल्याने एनसीबीने दोघांनाही ताब्यात घेतले. दोघांवरही एनडीपीएस कायद्यातील काही तरतुदींअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीदरम्यान दोघांनीही गांजाचे सेवन करत असल्याची कबुली एनसीबीला दिली. एनसीबीच्या ताब्यात असलेल्या दोन ड्रग्स विक्रेत्यांची चौकशी केल्यानंतर भारती व हर्षचे नाव समोर आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हर्षने स्वत:साठी गांजा खरेदी करत असल्याचे एनसीबीला सांगितले. अटकेनंतर दोनच दिवसांनी दंडाधिकारी न्यायालयाने दोघांची जामिनावर सुटका केली.

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो