शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्याचे एन्काऊंटर, तीन पिस्तूलसह शस्त्रसाठा जप्त

By संजय तिपाले | Updated: April 1, 2023 14:12 IST

पोलिस-नक्षल्यांत धूमश्चक्री: गडचिरोली पोलिसांच्या सी -६० जवानांची कारवाई

संजय तिपाले/गडचिरोली: महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील मुसपरसी (नारायणपूर) जंगल परिसरात १ एप्रिल रोजी सकाळी गडचिरोली पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात पोलिसांनी एका नक्षलवाद्याचा खात्मा केला. घटनास्थळावरुन तीन पिस्तूलसह मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. गडचिरोली पोलिसांच्या सी ६० या नक्षलविरोधी पथकाने ही कारवाई केली.

महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील दंडकारण्यात (अबुझमाड) भामरागड तालुक्यातील मुसपरसी (नारायणपूर) जंगल परिसरात १ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता गडचिरोली पोलिस दलाच्या सी ६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते. घनदाट झाडींनी वेढलेल्या या जंगलात अचानक नक्षल्यांनी पोलिसांवर हल्ला केला. स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला.

पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी पथकाने केलेल्या गोळीबारात एक नक्षलवादी ठार झाला. यावेळी  घटनास्थळावरुन तीन पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय नक्षलवाद्यांची शस्त्रसामुग्रीही हाती लागली. दरम्यान, सी ६० पथकातील जवान सुरक्षित असून पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या घटनेला दुजोरा दिला.  सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल, असे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले......

टॅग्स :naxaliteनक्षलवादी