शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नवाजुद्दीनच्या अडचणीत वाढ, पत्नी आलियाने कोर्टात नोंदविला जबाब 

By पूनम अपराज | Updated: October 16, 2020 20:29 IST

Nawazuddin Siddiqui's Wife Recorded Statement : आलियाने नवाजुद्दीन आणि त्याचा भाऊ, आईविरुध्द मुंबईत गुन्हा दाखल केला. हा दोघांमध्ये बराच काळ वाद आहे.

ठळक मुद्देअभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांची पत्नी आलिया सिद्दीकी उर्फ अंजली पांडे शुक्रवारी सीजीएम कोर्टात दाखल झाली. तेथे पोलिसांनी आलियाचा 164अंतर्गत जबाब नोंदविली.

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीशी झालेल्या वादामुळे त्यांची पत्नी आलिया सिद्दीकी शुक्रवारी जबाब नोंदवण्यासाठी मुझफ्फरनगर सीजीएम कोर्टात दाखल झाली. यावेळी, कडक सुरक्षेत तिचा जबाब नोंदविण्यात आला. आलियाने नवाजुद्दीन आणि त्याचा भाऊ, आईविरुध्द मुंबईत गुन्हा दाखल केला. हा दोघांमध्ये बराच काळ वाद आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांची पत्नी आलिया सिद्दीकी उर्फ अंजली पांडे शुक्रवारी सीजीएम कोर्टात दाखल झाली. तेथे पोलिसांनी आलियाचा 164अंतर्गत जबाब नोंदविली. यादरम्यान, आलियाने पत्रकारांशी बोलण्यास स्पष्ट नकार दिला. बुढाना इन्स्पेक्टर मगनवीर सिंह गिल यांनी सांगितले की, बुढाना निवासी चित्रपट अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांची पत्नी आलिया सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वी पती नवाझुद्दीन, तिचे भाऊ आणि आई इत्यादीविरूद्ध मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण तपासासाठी बुढाणा कोतवाली येथे आले होते. याप्रकरणी बुढाणा कोतवाली पोलिस तपास करत आहेत. गेल्या महिन्यातही आलियाने आपले जबाब नोंदवण्यासाठी बुढाणा कोतवाली गाठले होते. 

एसआय वीर नारायण सिंह यांनी खटला चालवणारे वकील सीजीएम कोर्टात खटल्याच्या आलिया सिद्दीकी यांची 164 अंतर्गत जबाब नोंदवला आहे. महत्वाचे म्हणजे चित्रपट अभिनेता नवाजुद्दीन गेल्या सात महिन्यांपासून कोरोना कालावधीमुळे त्याच्या घरी येत आहे. आजकाल तो मसूरीमध्ये राहत आहे. नवाजुद्दीनचा बराच काळ आपल्या पत्नीशी वाद होता. पत्नी आलियानेही त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे.

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आला आहे. सातत्याने त्याच्या व त्याची पत्नी आलियाच्या घटस्फोटाचे वृत्त समोर आले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने त्याला व्हॉट्स अॅप आणि ईमेलवर घटस्फोटाची लीगल नोटीस पाठवून सगळ्यांना चकीत केले आहे. आलियाने काही प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत नवाज व त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांच्या लग्नाला जवळपास दहा वर्षे झाले आहे. दहा वर्षानंतर आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत वेगळा होण्याचा निर्णय घेतला. आलियाचा दावा आहे की, नवाज तिचा व तिच्या मुलांची काळजी घेत नाही. त्यांचे नाते चांगले नाही आहे. त्यामुळे नाते आणखीन ताणण्यापेक्षा संपवण्यासाठी लाचार झाली. 

टॅग्स :Nawazuddin Siddiquiनवाझुद्दीन सिद्दीकीCourtन्यायालयMumbaiमुंबईDomestic Violenceघरगुती हिंसा