शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नवाब मलिकांचे आरोप बेसलेस; हे आहेत सर्व पंच, एनसीबीने केला खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 22:01 IST

Mumbai Rave Party On Cruise: आता एनसीबीनं पत्रकार परिषद घेत ते पंच असल्याचा खुलासा केला आहे.

ठळक मुद्देएनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एकूण १० पंच आहेत.

Mumbai Rave Party On Cruise: मुंबईतील समुद्रात क्रूझवरील ड्रग्ज पार्टी एनसीबीनं (NCB) उधळून लावली होती. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (aryan khan arrested) याच्यासह एकूण १६ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. पण या प्रकरणाला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर वेगळच वळण मिळालं आहे. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाणारे भाजपाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप मलिक यांनी केला. त्यावर आता एनसीबीनं पत्रकार परिषद घेत ते पंच असल्याचा खुलासा केला आहे.

 एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एकूण १० पंच आहेत. प्रभाकर साईल, किरण गोसावी, मनीष भानुशाली, ऑब्रे गोमेज, आदिल उस्मानी, व्ही. वायंगणकर, अपर्णा राणे, प्रकाश बहादूर, शोएब फैझ, मुजम्मिल इम्ब्राहीम अशी या १० पंचांची नावे आहेत. 

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात गेल्या चार दिवसांत एनसीबीनं केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली. मुंबईतील जोगेश्वरी भागात आज एनसीबीनं छापा टाकला. यात १५ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले असून अब्दुल शेख नावाच्या इसमाला अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या अटकेत असलेल्या मोहक जयस्वालनं दिलेल्या माहितीच्या आधारे आज हा छापा टाकण्यात आला होता. तसेच नवाब मलिकांनी केलेले आरोप निराधार असल्याचे एनसीबीने म्हटलं आहे. 

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोNCPराष्ट्रवादी काँग्रेसnawab malikनवाब मलिकDrugsअमली पदार्थ