शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नौसैनिकाने भावी वधूच्या घरून घेतले नऊ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 01:38 IST

सुरजकुमार याचा खून हा शेअर बाजारात गुंतविण्यात आलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीतून झाल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे.

- हितेन नाईकपालघर :  तलासरीतील वेवजी गावाच्या जंगलात सूरजकुमार दुबे या २७ वर्षीय नौदल सैनिकाचे अपहरण करून खून केल्याच्या प्रकरणाने जिल्ह्यात पुन्हा खळबळ माजली आहे. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथील साधू हत्याकांडानंतर अतिशय निर्घृणपणे नौसैनिकाचेही हत्याकांड झाल्याचे समोर आल्याने पोलिसांच्या कामगिरीविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. दरम्यान, सुरजकुमार याने आपल्या वागदत्त वधूच्या घरूनही ९ लाख रुपये घेतल्याचे उघड झाले आहे.सुरजकुमार याचा खून हा शेअर बाजारात गुंतविण्यात आलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीतून झाल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी याप्रकरणी १०० पोलिसांची १० पथके बनविण्यात आल्याची माहिती  दिली असून या प्रकरणाचा कसून शोध घेण्यात येत आहे. १ फेब्रुवारी रोजी सुरजकुमार याने आपल्या एटीएमचा वापर केला असून आपल्या होणाऱ्या वागदत्त वधूच्या घरून ९ लाखांची रक्कमही घेतल्याची बाब समोर आली आहे. लग्नाआधीच ९ लाख रुपये कशासाठी घेतले, याचीही माहिती पोलीस घेत आहेत. दरम्यान, मित्रांकडून अथवा एखाद्या खाजगी व्यक्तीकडून कर्जाऊ रूपाने घेतलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गडचिंचले येथील सामूहिक हत्याकांडाचे प्रकरण पोलिसांवर चांगलेच शेकले होते. आता या प्रकरणावरूनही गदारोळ माजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालघर पोलिसांवर पुन्हा प्रश्नचिन्ह तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र अशा चार राज्यांच्या सीमा ओलांडून त्याला महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आणून जाळण्यात आले. ही बाब गंभीर असून भाजप आ. राम कदम यांनी साधूंच्या हत्याकांडानंतर आता एका नौदल तरुणाचा जाळून खून केल्याने पालघर पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.