शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नेव्ही कर्मचाऱ्याचा मोबाईल चोरून पसार झालेली दुकली गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 19:12 IST

Robbery Case :दोघांना मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

डोंबिवली:  नेव्ही कर्मचा-याला मारहाण करीत त्याच्याजवळील मोबाईल चोरून पसार झालेल्या दोघांना चार तासातच अटक करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. हा चोरीचा प्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला होता. सुदर्शन पटेल आणि अमित वागरे (दोघांचे वय 18) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघे अनुक्रमे मास्क विक्री आणि दूध विक्री करायचे. दोघांना मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

नेव्हीत कर्मचारी असलेले सुदेश आमकर हे डोंबिवली पुर्वेकडील मढवी शाळेजवळील साईसदन इमारतीत राहतात. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता ते राजाजी पथ, स्वामी नारायण मंदिर समोरील रस्त्यावरून घरी परतत होते. साडेअकरा ते पावणोबाराच्या दरम्यान पाठीमागून आलेल्या दोघांनी आमकर यांची वाट अडवली आणि धककाबुककी करीत शिवीगाळ केली. दोघांपैकी एकाने आमकर यांच्या पॅन्टच्या पाठीमागील खिशात असलेला मोबाईल जबरदस्तीने काढून साथीदारासह पोबारा केला. दरम्यान हा सर्व प्रकार तेथील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला होता. आमकर यांनी लुटमार प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. वरीष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक संदीप शिंगटे यांच्या पथकाने सीसीटिव्हीच्या मदतीने अवघ्या चार तासात चोरटयांना बेडया ठोकल्या. आमकर यांच्या चोरण्यात आलेला मोबाईल देखील हस्तगत करण्यात आला आहे.

सहा महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

टॅग्स :ArrestअटकdombivaliडोंबिवलीMobileमोबाइलRobberyचोरीPoliceपोलिस