शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई: पामबीचवरील फेरफटका बेतला दोघांच्या जीवावर

By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 5, 2022 20:54 IST

वेगाने केला घात, सानपाडा येथील तिघांचा अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मजेसाठी पामबीच मार्गावर मोटरसायकलने फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या तिघांच्या अपघाताची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून त्यात एक अल्पवयीन आहे. मोटारसायकल अति वेगात असल्याने नियंत्रण सुटून त्यांचा अपघात घडला. रविवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पामबीच मार्गावर सरसोळे लगत हा अपघात घडला आहे. बेलापूर कडून वाशीला जाणाऱ्या दुचाकीचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती नेरुळ पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली असता दुभाजकामध्ये तिघेजण जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, मध्यरात्रीच्या सुमारास एकाला मृत घोषित करण्यात आले. तर सोमवारी सकाळी दुसऱ्या जखमीचा देखील मृत्यू झाला. तिसऱ्याची देखील प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राजा जाना (१६) व राजेश गुप्ता (३०) अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत. तर शवान मुल्ला (२१) य याच्यावर उपचार सुरु आहेत. तिघेही सानपाडा परिसरात राहणारे असून रविवारी रात्री सहज फेरफटका मारण्यासाठी मोटरसायकलने पामबीच मार्गावर गेले होते. सीवूड येथील चौकातून ते परत सानपाडाकडे वळले होते. यावेळी मोटरसायकल अति वेगात असल्याने सरसोळे येथे नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल दुभाजकामधील झाडाला धडकून त्यांचा अपघात झाला. अपघातावेळी मोटरसायकल कोण चालवत होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात