शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सायबर फसवणूकप्रकरणी देशभर छापे, दिल्लीत ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 05:22 IST

दिल्लीतील चार्टर्ड अकाउंटंट प्रमुख सूत्रधार! १५ हजार बँक खात्यांतून हजारो कोटी रुपयांची अफरातफर, दिल्लीत एका चार्टर्ड अकाउंटंटच्या फार्महाऊसवर धाड टाकण्यासाठी ईडीचे पथक गेले असता अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला.

मुंबई - सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारे हजारो कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणाची विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर ईडीच्या हाय-इंटेन्सिटी युनिटने गुरुवारी देशात अनेक ठिकाणी छापेमारी केली. दिल्लीत एका चार्टर्ड अकाऊंटंटच्या फार्महाऊसवरील छापेमारी दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. 

या छाप्यांदरम्यान १५ हजार बँक खात्यांतून हजारो कोटी रुपयांची अफरातफर झाल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी हजारो डेबिट कार्ड, मोबाईल फोन जप्त केले आहेत. गेल्या काही महिन्यांत देशाच्या विविध भागांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर ठगांनी लाखो नागरिकांचे हजारो कोटी रुपये लांबविले. या सर्व माहितीची अधिकारी  छाननी करीत होते. 

दिल्लीतील चार्टर्ड अकाउंटंट प्रमुख सूत्रधार   

गुन्हेगारीचे संपूर्ण नेटवर्क दिल्लीतील अशोक शर्मा हा चार्टर्ड अकाउंटंट आणि त्याचा भाऊ चालवीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या दिल्लीतील फार्महाऊसवर छापेमारी केली. त्यावेळी शर्मा बंधूंसह अन्य तिघांनी ईडीचे अतिरिक्त संचालक सूरज यादव यांच्यासह ईडी पथकावर हल्ला केला. या प्रकरणी शर्माच्या एका नातेवाइकाला पोलिसांनी अटक केली आहे. उकळलेला पैसा युएईयेथील पायपल पेमेंट कंपनीकडे वळविण्यात आल्याची माहितीही अधिकाऱ्यांना मिळाली. या कंपनीने हा पैसा मिळाल्यानंतर तो क्रिप्टो करन्सीत गुंतविल्याचे तपासात समोर आले आहे. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय