शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

मम्मा, चल आपणही पप्पांसारखे तारा होऊ अन्..; लहानग्या मुलीसह महिलेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 06:00 IST

हृदय पिळवटून टाकणारी ही घटना शनिवारी येथील विनयनगर परिसरात घडली. सुजाता प्रवीण तेजाळे (३६) व अनया प्रवीण तेजाळे (७) असे या दुर्दैवी मायलेकीचे नाव आहे

ठळक मुद्देसुजाता यांचे पती प्रवीण तेजाळे यांचा पाच महिन्यांपूर्वी कोरोनाने मृत्यू झाला होता.‘अनयाला येणारी पप्पांची आठवण अन् मला पतीचा विरह सहन होत नव्हता. आईबापाशिवाय अर्थ नाही आणि नवऱ्याशिवायही अर्थ नाही...!’ अशा शब्दांत चिठ्ठी लिहीत त्यांनी चिमुकलीसोबत जीवनप्रवास संपविला.

नाशिक :  ‘पप्पांची सतत आठवण येते. पप्पा जिकडे गेले तिकडे आपण जाऊ, आपणही पप्पांसारखे तारा होऊ आणि पप्पांबरोबरच तारा होऊन राहू...’ असे सात वर्षीय चिमुकलीने तिच्या मृत पित्याच्या आठवणी काढताना आईकडे व्यथा मांडली. महिलेलाही आपल्या पतीचा विरह सहन होत नसल्याने ‘दोघींच्या आयुष्यात आनंद  नसताना जगण्यात खरंच अर्थ नाही,’ असे सुसाइड नोटमध्ये लिहून स्वत:सह मुलीचाही जीवनप्रवास मातेने कायमचा संपविला. 

हृदय पिळवटून टाकणारी ही घटना शनिवारी येथील विनयनगर परिसरात घडली. सुजाता प्रवीण तेजाळे (३६) व अनया प्रवीण तेजाळे (७) असे या दुर्दैवी मायलेकीचे नाव आहे. शुक्रवारी सुजाता व अनया यांनी चर्चा करून आत्महत्या केल्याचे मृत्यूपूर्व चिठ्ठीतून समोर आले आहे. सुजाता यांनी लिहिलेली भावनिक दोन पानी ‘सुसाइड नाेट’ पाेलिसांच्या हाती लागली आहे. सुजाता यांचे दीर अशाेक तेजाळे हे त्यांच्या राहत्या घरी गेले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. 

सुजाता यांचे पती प्रवीण तेजाळे यांचा पाच महिन्यांपूर्वी कोरोनाने मृत्यू झाला होता. सुरुवातीचे काही दिवस अनया शांत होती. मात्र, नंतर सातत्याने तिला पप्पांची आठवण येत असल्याचे सुजाता यांनी सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. ‘अनयाला येणारी पप्पांची आठवण अन् मला पतीचा विरह सहन होत नव्हता. एकाकी आयुष्य काढणे खूपच कठीण आहे. जसा जन्म दिला तसेच तिची काळजी करून तिला घेऊन चालले... आईबापाशिवाय अर्थ नाही आणि नवऱ्याशिवायही अर्थ नाही...!’ अशा शब्दांत चिठ्ठी लिहीत त्यांनी चिमुकलीसोबत जीवनप्रवास संपविला.

टॅग्स :Policeपोलिस