शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत सराईत गुन्हेगाराचा टोळक्याकडून धारदार शस्त्राने वार करून खून, दोघांना अटक

By अझहर शेख | Updated: March 25, 2024 12:40 IST

निलेश श्रीपद उपाडे या २१ वर्षीय मृत्यू, मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडला प्रकार

अझहर शेख/संदीप झिरवाळ, पंचवटी: फुलेनगर परिसरातील म्हाडा इमारतीच्या मागे असलेल्या सुलभ शौचालयजवळ मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकावर चौघा संशयित आरोपींनी पोटावर, मानेवर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना सोमवारी (दि.25) मध्यरात्री दोन वाजेच्या सुमाराला घडली. या घटनेत दिंडोरी रोडवरील कालिका नगर मायको दवाखान्या मागे राहणारा निलेश श्रीपद उपाडे (21) याचा मृत्यू झाला. या खून प्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमाराला मयत निलेश हा त्याचा मित्र उमेश साबळे याच्या समवेत गप्पा मारत असतांना संशयित आरोपी विश्वास बाबर, यश बाबर, रोहित गायकवाड, निलेश सावंत, नरेश बाबर, अमित सावंत त्याठिकाणी आले व त्यांनी पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून कुरापत काढून निलेश याच्या पोटावर, मानेवर तसेच पाठीवर काहीतरी धारदार शस्त्राने वार केले या घटनेत निलेश गंभीर जखमी झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता तेथे उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. घटनेचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. याबाबत मयत निलेश याचा भाऊ रोहित श्रीपत उपाडे याने दिलेल्या तक्रारी वरून पंचवटी पोलिस ठाण्यात दंगल तसेच खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी