शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

नरेंद्र मेहतांचा केक वरिष्ठ पोलीस निरीक्षकास भोवण्याची शक्यता; पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 20:24 IST

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांचा वाढदिवस पोलीस ठाण्यातील त्यांच्या दालनात साजरा करण्यात आला होता . माजी आमदार नरेंद्र मेहता देखील त्यांच्या समर्थकांसह देसाई यांच्या दालनात पोहचले .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भ्रष्टाचार, बलात्कार  सह विविध गुन्ह्यात आरोपी असलेले भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या हस्ते पोलीस ठाण्यातच वाढदिवसाचा केक कापून खाणे आणि वाढदिवस साजरा करणे भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांना भोवण्याची शक्यता आहे . आम आदमी पार्टी सह अन्य काही पीडित नागरिकांनी या प्रकरणी तक्रारी केल्या नंतर पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत . 

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांचा वाढदिवस पोलीस ठाण्यातील त्यांच्या दालनात साजरा करण्यात आला होता . माजी आमदार नरेंद्र मेहता देखील त्यांच्या समर्थकांसह देसाई यांच्या दालनात पोहचले . तेथे केक कापण्यात आला व मेहतांनी देसाई यांना केक भरवला , बुके दिला त्याची छायाचित्रे मेहता समर्थकांनी समाज माध्यमांवर शेअर केली होती . 

सदर बाब लक्षात येताच आम आदमी पार्टी सह मेहतां विरोधातील फिर्यादी जय शुक्ला यांनी पोलीस ठाण्यातील आरोपी व पोलीस अधिकारी यांच्या ह्या बर्थडे पार्टी ची तक्रार पोलीस आयुक्तां पासून शासन स्तरावर केली आहे . मेहता व त्यांच्या पत्नी सुमन यांच्यावर काही महिन्यां पूर्वीच नवघर पोलीस ठाण्यात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे . त्या गुन्ह्यात मेहता हे पोलिसांना सापडले नव्हते . या शिवाय मेहतां विरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात अन्य तक्रारी प्रलंबित असून काही गुन्हे दाखल आहेत . मेहतांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात बलात्कार , फसवणूक पासून विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत . 

मेहतांना अटक न करता पळायची संधी देणे , त्यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यात काटेकोर तपास व पुरावे सादर न करता त्यांना मदत करणे , तक्रारी असून देखील कारवाई न करणे, मेहतांच्या विरोधकांवर मात्र खोटी कारवाई करणे असले प्रकार शहरातील नागरिक व तक्रारदारांना अनुभवयाला मिळाले आहेत असा आरोप तक्रारदारांनी केला आहे . 

पोलिसांच्या दप्तरी अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी आणि अनेक तक्रारी प्रलंबित असताना देसाई सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने पोलीस ठाण्यातच मेहतां सोबत केलेले बर्थडे सेलिब्रेशन हे मेहता व पोलिसांचे घनिष्ट लागेबांधे असल्याचे स्पष्ट करते. पोलिसांची प्रतिमा डागाळली जात असून पोलीस ठाण्यात असे आरोपीं वाढदिवस साजरे करणे गंबीर आहे असे आरोप शुक्ला सह आम आदमी पार्टीचे ब्रिजेश शर्मा , सुखदेव बिनबंसी, राजेश शर्मा आदींनी केला आहे .  पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त अमित काळे यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत . 

टॅग्स :Policeपोलिस