शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडचे पिस्तुल जालन्यात; गावठी पिस्तुल आणि काडतुसांसह दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 13:26 IST

जप्त केलेले पिस्तुल एकाने नांदेड येथून घेऊन जालना येथील व्यक्तीला विक्री केली

ठळक मुद्देवर्षभरात जालना शहरासह परिसरातून तब्बल सात पिस्तुल जप्त करण्यात आल्या आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात एका हॉटेलसमोरील कारमधून जप्त

जालना : अवैधरीत्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यासह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई बुधवारी सकाळी जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील एका हॉटेलसमोर करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेले पिस्तुल एकाने नांदेड येथून घेऊन जालना येथील व्यक्तीला विक्री केली होती.

जालना येथील एका व्यक्तीकडे गावठी पिस्तुल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. या माहितीवरून बुधवारी सकाळी  पथकाने जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात एका हॉटेलसमोरील कारमध्ये (क्र.एम.एच.२८- ए.झेड.१२८७) बसलेल्या मनोज मुकुंद वाळके (२६, रा. कन्हैय्या नगर, जालना) याची तपासणी केली. त्यावेळी मनोज याच्या कमरेला गावठी पिस्तुल, मॅक्झिनमध्ये दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरील पिस्तुल हे अजितसिंग मलखसिंग कलाणी (२७ रा. चंदनझिरा) याच्याकडून विकत घेतल्याचे त्याने सांगितले.

पोलिसांनी कारवाई करून कलाणी याला ताब्यात घेतले. कलाणी याने ते पिस्तुल नांदेड येथून विकत घेऊन वाळके याला विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी पिस्तुलासह, दोन जिवंत काडतुसे व कार जप्त केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोहेकॉ. सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, पोना. गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, प्रशांत देशमुख, अंबादास साबळे, कृष्णा तंगे, हिरामण फलटणकर, सचिन चौधरी, विलास चेके, संदीप मांटे यांच्या पथकाने केली.

आजवर ७ पिस्तूल जप्तचालू वर्षात जालना शहरासह परिसरातून तब्बल सात पिस्तुल जप्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने चार, दरोडा प्रतिबंधक पथकाने दोन व सदरबाजार पोलिसांनी एक पिस्तुल जप्त केली आहे. त्यामुळे पिस्तुल शहरात आणते कोण आणि कोठून याचा शोध घेऊन आरोपींच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. 

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस