शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

धक्कादायक! सातबारा उताऱ्यावरून गहाळ झाली 928 शेतकऱ्यांची नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 11:24 IST

Crime News: अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड येथील सुमारे ९० हेक्टरवरील ९२८ शेतकऱ्यांची नावे साताबाऱ्यावरुन गहाळ झाली आहेत.

रायगड : अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड येथील सुमारे ९० हेक्टरवरील ९२८ शेतकऱ्यांची नावे साताबाऱ्यावरुन गहाळ झाली आहेत. टाटा पाॅवर कंपनीसाठीच्या जमिन संपादनासाठी एमआयडीसीला जमीन देण्याबाबत संमती दिलेली नसताना हा प्रकार कसा घडल्याने शेतकरी देखील  चक्रावून गेले आहेत. विनायक हरिभाऊ पाटील या शेतकऱ्यांनी याबाबत उप विभागीय अधिकारी कार्यालयाकडून माहिती मागवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.टाटा कंपनीच्या १६०० मेगा वाॅटच्या औष्णिक वीज प्रकल्पासाठी २००७ साली जमिन संपादनाची प्रक्रिया राबवण्यात आली हाेती. ३८७. ७७ हेक्टर इतक्या जमिनीचे संपादन झाले आहे. या संपादनात सुमारे १९०७ शेतकऱ्यांनी संमती दिली तसेच निवाडा रक्कम स्वीकारली. पण, त्याच संपादनातील शहापूर येथील ६२.१९ हेक्टर मालकी असलेल्या ६९३ शेतकऱ्यांनी (खातेदारांनी) तर धेरंड येथील २८.०५ हेक्टर मालकीच्या २३५ खातेदारांनी संमती दिलेली नाही. असे असताना शहापूर धेरंड मधील ९२८ शेतकऱ्यांची नावे सात बारावरून  अलिबाग उप विभागीय अधिकारी कार्यालयाने कमी केली आहेत. याबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली गेलेली नाही. तसेच ताबा पावती अथवा कब्जा या विषयी माहिती मिळावी म्हणून  १४ मार्च २०२१ आणि २१ जुलैला उपविभागीय कार्यालयाकडून माहिती मागवून देखील त्याला कोणतेही उत्तर दिले गेले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. दरम्यान, शहापूर-धेरंडमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत माहिती घेताे, असे अलिबागचे प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले. 

शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावरुन कमी करताना अलिबागच्या उपविभागीय कार्यालयाने काेणालाही विश्वासात घेतले नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न साेडवण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने बैठक बाेलवावी. अन्यथा १५ ॲागस्टला उपविभागीय कार्यालयात प्रांताधिकाऱ्यांना भाताची राेपे भेट देण्याचे आंदाेलन छेडणार असल्याचा इशारा शेतकरी विनायक पाटील, नंदकुमार गंगाराम पाटील, प्रा. सुनील नाईक यांनी दिला आहे. 

योजनेच्या लाभापासून  शेतकरी वंचितशेतकऱ्यांची नावे सातबारा सदरी नसल्याने त्यांना तारण कर्ज, पिक विमा, नैसर्गिक नुकसान भरपाई, सरकारी पेन्शन, भात खाचराची दुरुस्ती, रोजगार हमी योजना, फळबाग लागवड, मत्स्य तलाव, किसान क्रेडीट कार्ड, पिक कर्ज, सरकारी भात विक्री, कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे