शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मुलाला ‘शेंबड्या’ म्हणणे मुलीच्या जिवावर बेतले; अल्पवयीन मुलगा फरार, आरोपीच्या वडिलांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 10:31 IST

मुलाने हत्या केल्यानंतर आरोपीच्या वडिलांनी मुलीचा मृतदेह बाजूच्या घरात टाकल्याची माहिती समोर आली.

नालासोपारा : शेजारी राहणाऱ्या लहान मुलीने चिडवले म्हणून १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. पेल्हार पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही  हत्येची घटना आरोपी मुलाच्या वडिलांना माहिती असूनही त्यांनी लपवली होती. 

मुलाने हत्या केल्यानंतर आरोपीच्या वडिलांनी मुलीचा मृतदेह बाजूच्या घरात टाकल्याची माहिती समोर आली. सध्या अल्पवयीन मुलगा फरार असून, आरोपी मुलाच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली. वसई फाटा येथे ४ डिसेंबरला एका आठ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह बंद घरातील मोरीत आढळून आला. तिचे पाय नायलॉनच्या बेल्टने बांधलेल्या स्थितीत होते. चांदनी साह असे मृत मुलीचे नाव आहे. ती जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकत होती. १ डिसेंबरला सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घराजवळील दुकानात आइस्क्रीम आणण्यासाठी दुकानात गेली आणि त्यानंतर ती अचानक गायब झाली. त्याबाबत बेपत्ता तक्रार १ डिसेंबरला तिच्या वडिलांनी पेल्हार पोलिस ठाण्यात दाखल केली होती.पोलिसांनी अधिक तपास केल्यावर त्याच परिसरातील एक अल्पवयीन मुलगा गायब असल्याचे कळले. 

पोलिसांनी त्या मुलाच्या वडिलांजवळ चौकशी केली असता खुनाच्या हत्येचा उलगडा झाला. मृत मुलगी शेजारी राहणाऱ्या मुलाला  शेंबड्या शेंबड्या चिडवत होती. रागाच्या भरात १ डिसेंबरला त्याने तिचा गळा दाबून हत्या केली. त्याने ही घटना वडिलांना सांगितली. वडिलांनी घटना लपवण्यासाठी चिमुकलीचा मृतदेह बंद खोलीमध्ये ठेवून त्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत होते. या घटनेमुळे खळबळ उडाली हाेती.

गोणीत सापडला चिमुकलीचा मृतदेहघरच्यांनी चिमुकलीचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला २० हजारांची रक्कमही देण्याचे जाहीर केले होते. ४ डिसेंबरला सकाळी ११ वाजेच्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या मागील एका चाळीत चिमुकलीचा मृतदेह आढळला. पाच नंबर बंद रूममध्ये मोरीत एका प्लास्टिकच्या गोणीत पाय बांधलेल्या अवस्थेत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदन अहवालासाठी पाठवला. चिमुकलीला गळा दाबून ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.