शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाचा बळजबरीचा प्रयत्न फसला, तरूणीच्या प्रसंगावधानामुळे नराधम पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 00:22 IST

बुधवारी रात्रीच्या सुमारास एका रिक्षाचालकाने २२ वर्षीय तरूणीचा विनयभंग करत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

पारोळ/नालासोपारा : बुधवारी रात्रीच्या सुमारास एका रिक्षाचालकाने २२ वर्षीय तरूणीचा विनयभंग करत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरूणीने प्रसंगावधान राखत रिक्षातून उडी घेत स्वत:ला या रिक्षाचालकाच्या तावडीतून सोडवले. घटनेनंतर रिक्षाचालक फरार झाला असला तरी दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. इक्र ाम उल शेख असे या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वसई पश्चिमेतील कोळीवाडा येथील पीडित २२ वर्षीय तरूणी बोईसर येथील डी-मार्टमध्ये कामाला आहे. कामावरून घरी परतत असताना वसई पश्चिमेतील हृषीकेश हॉटेलजवळ ती रिक्षाची वाट पाहत उभी होती. यावेळी इक्राम उल हक हा रिक्षावाला तिथे आला. तरूणीने त्याला कोळीवाडा जाणार का? असे विचारल्यानंतर त्याने नाही असे उत्तर दिले आणि तो पुढे जाऊ लागला. परंतु एकटी तरूणी पाहून त्याने आपला निर्णय बदलला आणि पीडित तरूणीला पुन्हा बोलावून कोळीवाडा जाईल, असे सांगत तिला रिक्षात बसण्यास सांगितले. मात्र या नराधमाने रिक्षाचा वेग काढून घाईगडबडीने रिक्षा चालवायला सुरूवात केली.यावर तिने रिक्षा हळू चालव असे त्याला सांगितल्यानंतर त्याने त्या तरूणीला ‘तुम्हारी जिंदगी अब मेरे हात में है, जादा होशियारी दिखाने की नही’, असे सांगत तो रिक्षा आणखीच वेगाने चालवू लागला. काहीतरी काळंबेरं घडणार या भितीने तरूणीने चालत्या रिक्षातून वसई पश्चिमेतील साई सव्हिर्सजवळ उडी मारून स्वत:चा जीव कसाबसा वाचवला. या प्रकारानंतर रिक्षा चालक घटनास्थळावरून फरार झाला. आजूबाजूच्या लोकांनी पीडितेला मदत करून सावरले. या अपघातात तिचा एक हात फ्रॅक्चर झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी