शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांमागे नागपूर कनेक्शन, समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 12:17 IST

mukesh ambani house :प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर काल स्फोकटांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्याने मुंबईच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये खळबळ उडालेली आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी केलेल्या अधिक तपासामध्ये ही स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न या स्कॉर्पिओमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यामागे नागपूर कनेक्शन असल्याचे दिसून आले आहेया जिलेटिनच्या कांड्यांवर नागपूरच्या कंपनीचं नाव आहे

मुंबई  - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानासमोर काल स्फोकटांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्याने मुंबईच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये खळबळ उडालेली आहे. दरम्यान, अंबानींच्या घरासमोरील रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या स्कॉर्पिओमधील स्फोटकांबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.  (The Nagpur connection was behind the explosives found near Mukesh Ambani's house)

मुकेश अंबानींच्या मुंबईतील निवासस्थानासमोर गुरुवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. दरम्यान, अंबानींच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावर सापडलेली ही कार चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर या स्कॉर्पिओमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यामागे नागपूर कनेक्शन असल्याचे दिसून आले आहे. या जिलेटिनच्या कांड्यांवर नागपूरच्या कंपनीचं नाव आहे. त्यामुळे आता नागपूरच्या कंपनीमधून ह्या जिलेटिनच्या कांड्या स्कॉर्पिओमधून अंबानींच्या निवासस्थानाजवळ कशा काय आल्या हे तपासामधून समोर येण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या अधिक तपासामध्ये ही स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यावरील नंबर प्लेट खोटी असल्याचे तपासात उघड झाहे आहे. ही स्कॉर्पिओ आठ ते दहा दिवसांपूर्वी मुंबईतील विक्रोळी परिसरातून चोरी झाली होती.  

या स्कॉर्पिओमध्ये अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारे एक पत्रही सापडले आहे. या पत्रात म्हटले आहे की, डियर नीता भाभी आणि मुकेश भैय्या आणि कुटुंबीय. हा केवळ ट्रेलर आहे. पुढच्या वेळी तुमच्या कुटुंबाला उडवण्यासाठीचे पूर्ण सामान येईल. सांभाळून राहा. दरम्यान, अंबानींच्या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली कार कुणी ठेवली आणि त्यातील धमकीचे पत्र कुणी लिहिले होते. याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. 

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी