शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

नांदेडमधूनच सुरू झाला गेन बिटकॉइन घोटाळा; २०१७ मध्ये दाखल झाला होता पहिला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 06:14 IST

या प्रकरणात सीबीआयकडून देशातील ६० ठिकाणी धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. त्यात नांदेडचाही समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेडातील अनेक व्यापारी, डॉक्टर आणि उद्योजकांनी २०१७ मध्ये आपल्याकडील बिटकॉइन प्रति महिना १० टक्के व्याजदर मिळण्याच्या आमिषाने गेन बिटकॉइनला दिले होते. सुरुवातीला काही महिने गेन बिटकॉइनने आकर्षक व्याजदरही दिले. नंतर मात्र गुंतवणूकदारांची फसवणूक केली. यात नांदेडातून जवळपास ५०० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आहे. 

२०१७ मध्ये या प्रकरणात नांदेडात पहिला गुन्हा दाखल झाला होता. गेन बिटकॉइनचा मुख्य निर्माता अमित भारद्वाज हा या प्रकरणात आरोपी होता. भारद्वाजने नांदेडात शिक्षण घेतले होते. या ओळखीचा फायदा उचलत त्याने गेन बिटकॉइन या डिजिटल चलनात गुंतवणूक करण्यासाठी अनेकांना आमिष दाखविले. नांदेडातील अनेकांनी भारद्वाज याच्यासोबत करार करून आपले बिटक्वॉइन गेन बिटकॉइन या कंपनीला दिले. त्या बदल्यात भारद्वाज हा दर महिन्याला गुंतवणूकदारांना १० टक्के व्याज देणार होता. 

भारद्वाजने अनेकांना आमिष दाखवित घातला गंडा सुरुवातीचे काही महिने भारद्वाजने नियमितपणे गुंतवणूकदारांना व्याज दिले. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून नांदेडातील अनेकांनी गुंतवणूक केली. परंतु त्यानंतर भारद्वाजने या मंडळींची फसवणूक केली. त्यानंतर तो थेट दुबईत पळाला होता. भारद्वाज याच्या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. देशात आल्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती.नांदेड पोलिसांनीही त्याचा ताबा मिळविला होता. मध्यंतरी भारद्वाज याचा मृत्यू झाल्याने सर्व गुंतवणूकदार धास्तावले होते. आता या प्रकरणात सीबीआयकडून देशातील ६० ठिकाणी धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. त्यात नांदेडचाही समावेश आहे.

नांदेडातच घेतले शिक्षणअमित भारद्वाज हा नांदेडातील एमजीएम महाविद्यालयात शिकत होता. त्यामुळे नांदेडातील अनेकांच्या संपर्कात तो होता. त्याने गेन बिटकॉइन कंपनी सुरू केल्यानंतर अनेकांनी त्यात गुंतवणूक केली होती. नांदेडातील एका डाॅक्टरने तर ५० लाख रुपयांचे बिटकॉइन भारद्वाजला दिले होते.

टॅग्स :Bitcoinबिटकॉइनfraudधोकेबाजी