शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Ranchi Two Sister's Death News: गूढ उकलेना! मध्यरात्री वाढदिवस साजरा केला; सकाळी मृतावस्थेत सापडल्या दोन बहिणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 22:28 IST

Crime News: मोठी बहीण शीतल लखानी रांचीच्या एका हॉस्पिटलमध्ये काम करते. तर तिची छोटी बहीण मान्या ही सरला बिर्ला स्कूलमध्ये 9 वी इयत्तेत शिकत होती. त्यांचे वडील संजय लखानी हे रांचीच्या मोठ्या कंत्राटदारांपैकी एक आहेत. 

झारखंडच्या रांचीमधून दोन सख्ख्या बहीणींनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही बहीणींनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. पोलीस आणि एफएसएलच्या टीमने तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वच हैराण झाले आहेत. पोलीस ही आत्महत्या की हत्या याचा शोध घेत आहेत. 

मोठी बहीण शीतल लखानी रांचीच्या एका हॉस्पिटलमध्ये काम करते. तर तिची छोटी बहीण मान्या ही सरला बिर्ला स्कूलमध्ये 9 वी इयत्तेत शिकत होती. त्यांचे वडील संजय लखानी हे रांचीच्या मोठ्या कंत्राटदारांपैकी एक आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री मोठी बहीण शीतल हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर रात्री दोन्ही बहिणी खोलीत झोपायला गेल्या. सर्व काही ठीक असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र, सकाळी दोघांचेही मृतदेह खोलीतून सापडले. दोघांनाही तातडीने गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. मोठी मुलगी शीतल लखानी हिचे लग्न पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार होते. ६ महिन्यांपूर्वी तिचा एचडीएफसी बँकेत काम करणाऱ्या तरुणाशी साखरपूडा झाला होता. दोन्ही बहिणींनी आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एक दिवसापूर्वी त्यांच्या घरातील पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला होता. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रिम्समध्ये पाठवण्यात आले आहेत. आत्महत्या की खून या सर्वच बाजूंनी पोलीस तपास करत आहेत. रात्री बर्थडे सेलिब्रेट करून दोन्ही बहिणी आपल्या खोलीत गेल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. पहाटे 5.40 च्या सुमारास तिच्या आईने खोली उघडली असता दोन्ही बहिणींना उलट्या झाल्या होत्या व त्या बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या.

रांची ग्रामीण एसपी नौशाद आलम यांनी सांगितले की, ज्या खोलीत दोन्ही बहिणींचे मृतदेह सापडले होते ती एफएसएल तपासणीनंतर सील करण्यात आली आहे. याशिवाय मोठ्या बहिणीचे लग्न ठरले असून वाढदिवसाला तिचा होणारा नवराही आला होता. मात्र, वाढदिवस साजरा करून तो त्याच्या घरी परतला असल्याचे नातेवाइकांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Jharkhandझारखंड