शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

“माझा फादर स्टॅन स्वामी होऊ नये हीच इच्छा”; सचिन वाझेने NIA कोर्टात व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 22:30 IST

Sachin Vaze : सचिन वाझे याला खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास विशेष न्यायालयाकडून परवानगी

ठळक मुद्देगेल्या आठवड्यात एनआयएने अंटालिया प्रकरणी वाझे याची चौकशी करण्यासाठी दोन दिवसांचा ताबा मिळावा, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता.

मुंबई :  अंटालिया बॉंस्बस्फोटके प्रकरणी चौकशी करण्याकरिता  निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा ताबा देण्यास विशेष न्यायालयाने एनआयएला सोमवारी नकार दिला. तर दुसरीकडे न्यायालयानेसचिन वाझे याला हृदयाच्या आजाराशी संबंधी खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली.

खासगी रुग्णालयात करण्यात येणाऱ्या उपचाराचा खर्च वाझे व त्याच्या कुटुंबिय करेल, असे विशेष एनआयए न्यायालयाने स्पष्ट केले. वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी मिळावी यासाठी वाझे याने त्यांच्या वकिलामार्फत विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. आपल्या तीन धमन्यांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक ब्लॉकेज आहेत. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. आपल्याला स्टॅन स्वामी यांच्याप्रमाणे कारागृहातच अंतिम श्वास घ्यायचा नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी द्यावी, असे वाझे याने अर्जात म्हटले आहे. 

गेल्या आठवड्यात एनआयएने अंटालिया प्रकरणी वाझे याची चौकशी करण्यासाठी दोन दिवसांचा ताबा मिळावा, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. तसेच सहआरोपी सुनील माने याची पाच दिवसांचा ताबा मिळावा, अशीही विनंती केली होती. वाझे, माने व अन्य आठ आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाबरोबर वाझे व माने यांचे जबाब तपासून पाहायचे आहेत, असे म्हणत एनआयएने वाझे व माने यांचा ताबा मागितला होता. मात्र, सोमवारी विशेष न्यायालयाने वाझे व माने यांचा ताबा देण्याची एनआयएची विनंती मान्य केली. 

अंटालियाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेव्याबद्दल तसेच ठाण्याचा व्यावसायिक मनसुख हिरे याची हत्या केल्याबद्दल वाझे याला एनआयएने २५ फेब्रुवारी रोजी अटक केली. 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCourtन्यायालयhospitalहॉस्पिटलArrestअटक