शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
2
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
3
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
4
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
5
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
6
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
7
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
8
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
9
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
10
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
12
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
13
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
14
ना भिंतीवर पोस्टर, ना रॅली, ना फ्लेक्सबाजी; जपानची निवडणूक पद्धत पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
15
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
16
इराणवरील लष्करी कारवाईला तूर्तास ब्रेक; अमेरिकेनं दिली चर्चेची आणखी एक ऑफर, तोडगा निघणार?
17
"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
18
Uday Samant: 'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
19
दुपारी जेवणानंतर का येते झोप? सायंटिफीक कारण समजल्यावर तुम्हीही नक्कीच घ्याल 'पॉवर नॅप'
20
IND vs NZ: विराट-शिखरचा विक्रम धोक्यात! श्रेयस अय्यर वनडे क्रिकेटमध्ये रचणार 'असा' इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Crime: पत्नीची हत्या करून पळालेल्या खुन्याची भांडूपमध्ये लोकलखाली येत आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 07:00 IST

Mumbai Crime News: मोबाइलमुळे चेहरा उघड झाला. मृत झालेल्या पोपटकडे एक तुटलेल्या अवस्थेत मोबाइल आढळला.

डोंबिवली : पत्नी ज्योती हिचा गळा दाबून खून करून पसार झालेल्या पोपट दाहिजे (वय ३६) याने भांडुप येथे लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करत खुनाचा गुन्हा दाखल केला. याला मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिपान शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.

पोपट हा बांधकामाच्या ठिकाणी बिगारी म्हणून काम करत होता. मानपाडा पोलिस ठाण्यात पोपटविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सोमवारी सकाळी भांडुप रेल्वे स्थानकात धावत्या लोकलखाली उडी मारून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. मोबाइलमुळे चेहरा उघड झाला. मृत झालेल्या पोपटकडे एक तुटलेल्या अवस्थेत मोबाइल आढळला. मोबाइल दुरुस्त करणाऱ्या दुकानदाराच्या मदतीने फोनचा आयएमईआय नंबर शोधला. ट्रेसिंग कॉल डिटेल्सवरून मोबाइलवर सर्वाधिक फोन केलेल्या नंबरवर संपर्क साधताच तो फोन मानपाडा पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांचा आढळला. यावरून मृत व्यक्ती हा पोपट असून, तो खुनाच्या गुन्ह्यात हवा होता, ही माहिती समोर आली.

वांद्रे-माहीमदरम्यान रुळ ओलांडताना एकाचा मृत्यू

वांद्रे आणि माहीम स्थानकांदरम्यान शुक्रवारी सकाळी रेल्वे रुळ ओलांडताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला. यामुळे पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल वाहतुकीला मोठा फटका बसला. मृत व्यक्ती रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ट्रेनने धडक दिली. या अपघातामुळे चर्चगेटकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल सुमारे ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. लोकलमध्ये गर्दी होती. मृतदेह काढून टाकल्यानंतर आणि ट्रॅक क्लिअरन्स केल्यानंतर, रेल्वे सेवा हळूहळू पूर्ववत आपाण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Wife's Killer Commits Suicide by Train After Fleeing in Bhandup

Web Summary : After murdering his wife in Dombivli, Popat Dahije, 36, committed suicide by jumping in front of a local train in Bhandup. Police investigation revealed his identity through a damaged phone, confirming the murder suspect's death.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईMumbai policeमुंबई पोलीस