शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पाकीट मारताना पकडल्याने केली हत्या, पोलिसांकडून पाकिटमाराला अटक 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 8, 2022 16:44 IST

महापे येथील घटना : बेघर व्यक्तीचा आढळला होता मृतदेह 

नवी मुंबई : बेघर व्यक्तीचे पाकीट मारत असताना त्याने विरोध केल्याने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी पाकिटमाराला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ११ संप्टेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

शिळफाटा मार्गावरील महापे येथील पुलाखाली बेघर व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. व्यंकटेश शेट्टी उर्फ अण्णा (५५) असे मयत व्यक्तीचे नाव असून ते पुलाखालीच रहायला होते. रविवारी सकाळी त्यांचा राहत्या ठिकाणी मृतदेह आढळून आला होता. डोक्यात दगड घालून त्यांची हत्या झालेली होती. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांनी निरीक्षक सुनील कदम, सहायक निरीक्षक प्रभाकर शिऊरकर यांचे पथक केले होते. त्यांनी गुन्ह्याचा उलगडा करत मारेकरू आकाश चव्हाण (२६) याला रबाळे एमआयडीसी परिसरातून अटक केली आहे. शनिवारी मध्यरात्री आकाश हा त्या परिसरातून भटकत होता. यावेळी त्याने पुलाखाली झोपलेल्या व्यंकटेश शेट्टी यांचे पाकीट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु शेट्टी यांनी विरोध केल्याने संतापात आकाश याने त्यांच्या डोक्यात दगड मारला होता. यातच ते जखमी होऊन जागीच मृत पावल्याची कबुली त्याने दिली असल्याचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. याप्रसंगी सहायक आयुक्त गजानन राठोड, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस