शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

चाकण येथे मार्केटमध्ये झोपू न दिल्याने तरुणाने केला खून; ८ तासांत आरोपीला केले अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 15:35 IST

मार्केटमध्ये झोपू नको, असे म्हणाल्याचा राग मनात ठेवून तरुणाने केला हा खून

ठळक मुद्देयाप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : चाकण येथे पुणे-नाशिक महामार्गालगत शनिवारी (दि. ३) एकाचा निर्घूण खून झाला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या युनिट तीनच्या पथकाने एका तरुणाला अटक केली आहे. मार्केटमध्ये झोपू नको, असे म्हणाल्याचा राग मनात ठेवून तरुणाने हा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 

मनोज हरिप्रसाद कुमरे (वय २६, रा. चाकण, मूळगाव सुखापुरापट्टी, हर्रई, ता. अमलवाडा, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रामदास राजाराम घुंबरे (वय ४८, रा. चाकण, मूळ रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथे पुणे - नाशिक महामार्गाच्या बाजूला भाजी मार्केटच्या पत्राशेडमध्ये रामदास घुंबरे यांच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याचा प्रकार शनिवारी समोर आला. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने युनिट तीनच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. त्यासाठी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. आरोपी मनोज कुमरे हा चाकण येथील तळेगाव चौकात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. रामदास घुंबरे व मार्केटमधील गाळयांचे गॅनेजर यांनी मार्केटमध्ये थांबायचे नाही व झोपायचे नाही असे बोलून मारहाण करून शिवीगाळ केली होती. तसेच रामदास घुंबरे यांनी शुक्रवारी (दि. २) रात्री साडेदहाच्या सुमारास मार्केटमध्ये झोपू नको म्हणून शिवीगाळ केली होती. त्यानंतर घुंबरे हे मार्केटमध्ये झोपले. मात्र त्यांनी शिवीगाळ केल्याचा राग मनात ठेवून रात्री साडेबाराच्या सुमारास घुंबरे हे झोपले असताना त्यांच्या डोक्यात दगड मारून आरोपी मनोज कुमरे याने त्यांचा खून केल्याची कबुली दिली आहे. आरोपी याला चाकण पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. 

युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले,  पोलीस कर्मचारी हजरत पठाण, यदु आढारी, नाथा केकाण, सचिन मोरे, विठठल सानप, गंगाधर चव्हाण, योगेश्वर कोळेकर, महेश भालचिम, राजकुमार हनमते, सागर जैनक, त्रिनयन बाळराराफ, प्रवीण पाटील, राहुल सूर्यवंशी, प्रमोद ढाकणे व गजानन आगलावे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :ChakanचाकणMurderखूनPoliceपोलिसArrestअटक