शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

अकोटात क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 11:50 IST

‘माझ्याकडे डोळे वटारून का बघतो’ या क्षुल्लक कारणावरून अकोट शहरातील एकाने दुसऱ्याची चाकूचे वार करून हत्या केली.

ठळक मुद्देमुदासिर अली मुख्तार अली असे मृतकाचे नाव आहे.आरोपी अब्दुल शाहरुख अब्दुल राजिक याला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

- विजय शिंदेअकोट: ‘माझ्याकडे डोळे वटारून का बघतो’ या क्षुल्लक कारणावरून अकोट शहरातील एकाने दुसऱ्याची चाकूचे वार करून हत्या केल्याची घटना २८ मे रोजी रात्री घडली. मुदासिर अली मुख्तार अली असे मृतकाचे नाव असून, पोलिसांनी आरोपी अब्दुल शाहरुख अब्दुल राजिक याला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.शहरातील धारुळी वेस भागात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पोलिसांकडून प्राप्त माहितीनूसार, रमजान महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृतक मुदासिर अली मुख्तार अली याचा लहान भाऊ व आरोपी अब्दुल शहारुख अब्दुल राजिक यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर २८ मे रोजी रात्री धारोळी वेस या ठिकाणी पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले. ‘तु माझ्याकडे डोळे वटारून का बघतो’ असे म्हणत आरोपी अब्दुल शहारुख यांने आपल्या हातातील चाकुने मुदासिर अली याच्या छातीच्या डावे बाजूला सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन खाली पडलेल्या मुदासिर अली याला अकोट ग्रामीण रुग्णालय आकोट येथे नेले. तेथून त्याला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. सर्वोपचार रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची फिर्याद अकोट शहर पोलीस स्टेशनला मोबीन अली जामीन अली यांनी दाखल केली. पोलीसांनी आरोपी अब्दुल शहारुख अब्दुल राजिक रा. धारुळी वेस अकोट यांच्या विरूध्द भांदवी ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहीती दिली. आरोपीला रात्रीत अटक करण्यात आलीआहे. पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी