शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गल्ला पळविण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मालकासह पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 06:56 IST

crime news : या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून ५ जणांना अटक केली. 

भिवंडी : चायनीज गाडीवरील पैशाचा गल्ला पळविण्याच्या वादातून गाडीच्या मालकासह ५ जणांच्या टोळक्याने शफिक शेख (वय ३२) यांची भररस्त्यात हत्या केल्याची  घटना सोमवारी रात्री भिवंडीत वंजारपट्टी नाका परिसरात घडली. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून ५ जणांना अटक केली. 

शफिक महबूब शेख (३२, रा. म्हाडा कॉलनी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अफजल नूरमोहम्मद सिद्दिकी (२७), अफसर नूरमोहम्मद सिद्दिकी (२६), मो. बशीर अन्सारी (२८), नूर मोहम्मद मकदूमबक्ष सिद्दिकी उर्फ पुरीभाजीवाला उस्ताद (६४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपी असलेले बापलेक हे तिघेही भिवंडीतील नदीनाका भागात राहणारे आहेत. तर आरोपींमध्ये एका साडेचौदा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.

आरोपी अफजल नूर मोहम्मद याची वंजारपट्टीनाका परिसरात अबूजी बिल्डिंगसमोर चायनीजची गाडी आहे. या गाडीवर सोमवारी रात्री उशिरा शफिक आला होता. त्यावेळी त्याने चायनीज गाडीवर काम करणाऱ्या कारागिराशी वाद घातला. त्यानंतर गाडीवरील पैशाचा गल्ला पळविला असता, पाचही आरोपींनी शफिकला रस्त्यावरच पकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर शफिकला भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

नातेवाइकांचा गोंधळशफिकच्या नातेवाइकांनी घटनास्थळी गोंधळ घातला होता. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. निजामपूर पोलिसांनी पंचनामा करीत हत्येसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून मंगळवारी सकाळी पाचही आरोपींना अटक केली. पुढील तपास सपोनि जमीर शेख करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी