शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील वाठोड्यात तरुणाची निर्घृण हत्या : लहान भावानेच केला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 20:03 IST

अवघ्या कुटुंबाला वेठीस धरणाऱ्या भावाची त्याच्या लहान भावाने तीन साथीदारांच्या मदतीने निर्घृण हत्या केली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देमुख्य आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवघ्या कुटुंबाला वेठीस धरणाऱ्या भावाची त्याच्या लहान भावाने तीन साथीदारांच्या मदतीने निर्घृण हत्या केली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे ही थरारक घटना घडली. शेजारी धावल्यामुळे ही घटना लगेच उघडकीस आली. वाठोडा पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली असून त्याचे तीन साथीदार फरार आहेत.विक्की गुरुदेवप्रसाद जयस्वाल (वय २६) असे मृताचे नाव आहे. तर, त्याचा लहान भाऊ शुभम गुरुदेवप्रसाद जयस्वाल (वय २४) या हत्याकांडाचा सूत्रधार आहे.पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, मृत विक्की हा त्याच्या घराच्या बाजूला राहणारे गणेश राणे यांच्याकडे कॅटरर्सच्या कामावर जायचा. त्याला दारूचे व्यसन होते. तो दारू पिला की सर्व विसरून जायचा. विक्षिप्तपणे वागायचा. आई, भाऊ, पत्नी या सर्वांनाच तो प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. घाणेरड्या शिव्या देऊन मारहाण करायचा. साहित्याची फेकफाक करायचा. घरच्यांचे खाणेपिणेही त्याने मुश्कील केले होते. जवळपास रोजचाच त्याचा हा त्रास होता. रविवारी रात्री असेच झाले. त्याने दारूच्या नशेत घरातील सदस्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. घरात आदळआपट केली. मध्यरात्र झाली तरी त्याचा त्रास कमी होत नव्हता. त्याला वारंवार समजावूनही तो ऐकत नव्हता. त्याच्या या वर्तणुकीने आई, पत्नी आणि विक्कीचा भाऊही रडकुंडीला आला होता. त्यामुळे शुभमने त्याचे तीन साथीदार बोलावून घेतले. पहाटे २ च्या सुमारास दारूच्या नशेत तर्र असलेल्या विक्कीला अंथरुणावरच पकडून घातक शस्त्राचे अनेक घाव त्याच्या शरीरावर घातले. जीवाच्या आकांताने विक्की ओरडत होता. मात्र, त्याला जिवंत सोडले तर तो घरातील सर्वांनाच मारेल म्हणून शुभम आणि त्याचे साथीदार त्याच्यावर शस्त्राचे सपासप घाव घालत होते. पोट, कंबर, छाती, डोके, गळा अन् हातावरही अनेक घाव घालून आरोपींनी त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले.दरम्यान, जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्याविक्कीचा आवाज ऐकून बाजूला राहणारे गणेश राणे आणि विक्कीचा मित्र रोहन आखरे (रा. कोतवाली) यांंनी तिकडे धाव घेतली. आरोपींनी आतून दार लावून घेतल्यामुळे त्यांनी १०० क्रमांकावर फोन करून या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षात कळविली.काही वेळेतच वाठोडा पोलीस तेथे पोहचले. त्यांनी तेथेच बसून असलेल्या शुभमला ताब्यात घेतले.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर