शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

समलिंगी संबंध ठेवण्याच्या वादात तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 04:50 IST

इन्स्टाग्रामवरून मैत्री झाल्यानंतर समलिंगी संबंध ठेवण्यावरून दोघांमध्ये झालेला वाद मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना रविवारी वांद्रे येथे घडली.

मुंबई : इन्स्टाग्रामवरून मैत्री झाल्यानंतर समलिंगी संबंध ठेवण्यावरून दोघांमध्ये झालेला वाद मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना रविवारी वांद्रे येथे घडली. पार्थ रावल (वय २५) असे मृताचे नाव असून पोलिसांनी या प्रकरणी धवल उनाडकट (२४) याला अटक केली आहे.ब्लाऊज डिझायनरचे काम करणा-या महंमद कोमरंगची (२७) बोरीवलीत राहत असलेल्या धवल उनाडकटबरोबर इन्स्टाग्रामवरून मैत्री झाली. ‘गे’ असल्याने त्याने महंमदशी शारीरिक संबंध ठेवले. कोमरंगने त्याला एचआयव्ही चाचणी करण्यास सांगितले. मात्र उनाडकटने त्याला नकार दिल्यानंतर त्याच्याशी संपर्क तोडला. सोशल मीडियावरही कोमरंगने त्याला ब्लॉक केले होते. त्यामुळे रविवारी उनाडकटने त्याला खूश करण्यासाठी ‘आय लव्ह यु’ असा मेसेज टाकला. कोमरंग यानेत्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे चिडून तो त्याच्या घरीआला. तेथे दुबईवरून आलेला महंमदचा मित्र उपस्थित होता. त्या दोघांत ‘संबंध’ असावेत, या शंकेने उनाडकटने त्या दोघांबरोबर भांडण सुरू केले.कोमरंगचा गळा त्याने लॅपटॉप चार्जरच्या वायरने आवळून मारहाण केली. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या रावलवर लाकडी मेणबत्तीच्या स्टँडने मारले. त्यामध्ये रावल गंभीर जखमी झाल्याने कोमरंगने त्याला खासगी रुग्णालयात नेले. मात्रगंभीर दुखापत झाल्याने तिथल्या डॉक्टरने त्याला टाके घालण्यासनकार दिला त्यामुळे त्यालालीलावती रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी किरकोळ उपचार करून अ‍ॅडमिट करण्याचा सल्लाडावलून दोघे जण त्याला घरी घेऊन आले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने थोड्या वेळातच त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी