शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

संपत्तीच्या वादातून महिलेची घरात घुसून हत्या; ११ जण पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 20:08 IST

महिला व तिच्या पतीवर हल्ला केल्यानंतर संबंधितांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली.

ठळक मुद्देआरोपींनी घरात घुसून दाम्पत्याला केली मारहाण महिलेचा पती गंभीर मारहाणीत जखमी 

जालना : संपत्तीच्या वादातून एका महिलेचा खून केल्याप्रकरणी ११ जणांविरूध्द सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जालना शहरातील काझीपुरा भागात घडली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत या प्रकरणातील ११ आरोपींना जेरबंद केले.

हिना सय्यद माजीद (३०) असे मयत महिलेचे नाव आहे. हिना सय्यद माजीद व त्यांचे पती सय्यद माजीद सय्यद कय्यूम हे रविवारी रात्री घरी होते. त्यावेळी अचानक घरी आलेल्या अरबाज खान जाफर खान, निलोफर जाफर खान, नसीमाबी जाफर, हलिमाबी धूमअली शहा, नसीमाबी शेख वहाब, शहाबाज जाफर खान, शेख अजगर शेख अब्दुल वहाब, शबाना धुमअली शहा, अकबर धुमअली शहा, नफीसा अलताफ खान, इस्माईल उर्फ शक्ती अहेमद शहा यांनी घरात घुसून हिना सय्यद यांना लोखंडी रॉड, काठीने मारहाण केली. तसेच चाकूने वार करून गंभीर जखमी केले. 

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या हिना सय्यद यांचा मृत्यू झाला. शिवाय सय्यद माजीद सय्यद कय्यूम यांनाही लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जखमी सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील ११ जणांविरूध्द सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोनि संजय देशमुख, सपोनि रूपेकर आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच सर्व ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सीसीटीव्हीचा डीव्हीआर नेला काढूनमहिला व तिच्या पतीवर हल्ला केल्यानंतर संबंधितांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी संबंधित डीव्हीआरचाही शोध सुरू केला आहे. तपास सपोनि नागवे हे करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीJalanaजालनाArrestअटक