शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

टपली मारल्याच्या रागातून दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 07:28 IST

Crime News : वागळे इस्टेट येथील ज्ञानेश्वरनगर परिसरातील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात मंगळवारी दहावीची चाचणी परीक्षा होती. वर्ग भरल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता किरकोळ कारणावरून तुषारसह त्याच्या काही मित्रांनी आधीचा वाद उकरून काढला.

ठाणे : राजर्षी शाहू महाराज विद्यालयातील दहावीतील विद्यार्थ्याची केवळ टपली मारल्याच्या रागातून त्याच शाळेतील चौघा विद्यार्थ्यांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. तुषार साबळे (१५, रा. ज्ञानेश्वरनगर, वागळे इस्टेट, ठाणे) असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून चौथ्याचा शोध सुरू असल्याचे वागळे इस्टेट पोलिसांनी सांगितले.

वागळे इस्टेट येथील ज्ञानेश्वरनगर परिसरातील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात मंगळवारी दहावीची चाचणी परीक्षा होती. वर्ग भरल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता किरकोळ कारणावरून तुषारसह त्याच्या काही मित्रांनी आधीचा वाद उकरून काढला. सोमवारी दुपारी चार ते पाच जणांच्या दोन गटांमध्ये टपली मारण्यावरून वाद झाला होता. हाच वाद मंगळवारी पुन्हा उफाळून आला.

तेव्हा दहावी ब तुकडीतील तुषार मध्यस्थीसाठी गेला असता त्यानेच टपली मारल्याचा समज झाल्याने त्याच्या छातीवर दहावी अ तुकडीतील एकाने चाकूने वार केले. त्याच्या अन्य तीन साथीदारांनीही मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या तुषारला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

एका साथीदाराचा पोलिसांकडून शोध सुरूशालेय विद्यार्थ्यांमधील या हाणामारीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले, निरीक्षक विजय मुतडक आणि उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ यांच्या पथकाने मुख्य सूत्रधारासह तीन १५ वर्षीय मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या अन्यही एका साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे