शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

लातूर: दगडाने ठेचून एकाचा खून; मालवाहतूक टेम्पोही पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 22:49 IST

देवणी पोलीस ठाण्यात बुधवारी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवणी (जि. लातूर) : नांदेड जिल्ह्यातील मुळचा रहिवासी असलेला एकजण निलंग्याचे मालवाहतुकीचे भाडे घेऊन आला होता. तो परतत असताना त्याचा देवणी तालुक्यातील वलांडी- तळेगाव रस्त्याशेजारील एका शेतात अज्ञाताने दगडाने ठेचून खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. अज्ञाताने मालवाहतूक टेम्पोही पळविला आहे. याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात बुधवारी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालाजी शेषेराव बनसोडे- पाटील (३५, रा. बिहारीपूर, ता. मुखेड, जि. नांदेड, हमु. बिदर गेट, हावगीस्वामी कॉलनी, उदगीर) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, मयत टेम्पो मालक बालाजी बनसोडे पाटील हा मालवाहतुकीचा व्यवसाय करीत होता. तो मंगळवारी निलंगा येथे भाडे घेऊन आला होता. सायंकाळी तो निलंग्याहून उदगीरकडे परतत होता. रात्री ७.३० वा. च्या तो वलांडी येथे पोहोचला असता, पत्नीचा मोबाईलवर फोन आला. तेव्हा वलांडीपर्यंत आलो असून उदगीरला पोहोचत असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, कुटुंबियांचा संपर्क तुटला.

बुधवारी सकाळी वलांडी- तळेगाव रस्त्याशेजारील वलांडी शेत शिवारात त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. तसेच मालवाहतूक टेम्पो, मोबाईल आणि इतर कागदपत्रेही अज्ञाताने पळविल्याचे दिसून आले. याप्रकरणी मयताचा भाऊ राजेश शेषेराव बनसोडे पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध देवणी पोलीस ठाण्यात कलम ३०२, २०२ भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा व भाऊ असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सी.एस. कामठेवाड हे करीत आहेत.

श्वान पथक, ठसे तज्ज्ञ दाखल

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, निलंग्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे यांनी भेट देऊन पाहणी केली आणि तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. दरम्यान, घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. तपासासाठी दोन पोलीस पथके तयार करून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर