शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूकीच्या रागातून घाटकोपरमधील एकाची हत्या; चौघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 21:26 IST

याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे.

ठळक मुद्देते 17 जून पासून कामानिमित्त कराडला गेले होते. कलीम शब्बीर अहमद कुरेशी याने पाल यांचा मृतदेह कुंभार्ली घाटामध्ये नेऊन खोल दरीत फेकून दिला. पोलिसांनी पाल यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या मोबाईलचा सीडीआर काढून तपास केला

मुंबई - घाटकोपर येथील व्यक्तीने मांडुळ साप तस्करीमध्ये लाखोंची फसवणुक केल्याचा राग मनात ठेवून त्या व्यक्तीची कराडच्या कोयनानगर येथे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी घाटकोपरपोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. मृत इसमाचे नाव उदयभान रामप्रसाद पाल (47) असे असून अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे प्रदीप शंकर सुर्वे (47), विनोद पोपट शुद्रीक (30), सुरेश बाळू सोनावणे (33) आणि अक्षय दीपक अवघडे (23) अशी आहेत. उदयभान पाल हे घाटकोपरच्या अशोक नगर परिसरात राहात होते. ते 17 जून पासून कामानिमित्त कराडला गेले होते. मात्र बरेच दिवस झाले तरी पाल घरी परत न आल्याने त्यांच्या पत्नी सावित्री पाल यांनी घाटकोपर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर तपासादरम्यान पोलिसांनी पाल यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या मोबाईलचा सीडीआर काढून तपास केला असता पाल हे मांडुळ साप तस्करीमध्ये सक्रिय असल्याचे उघड झाले. याआधारे पोलिसांनी पुढे केलेल्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप शंकर सुर्वे याची पाल यांनी मांडुळ साप विक्री प्रकरणात 21 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केली होती. त्यामुळे सुर्वेचा पाल यांच्यावर राग होता. त्यातूनच पाल कराड येथे आले असता पाल यांना कोयनानगर, गोपाळवाडी येथील ओढ्यामध्ये नेऊन प्रदीप सह इतर आरोपींनी मिळून लाकडी दांड्याने मारहाण करत त्यांचा खून केला. त्यानंतर कलीम शब्बीर अहमद कुरेशी याने पाल यांचा मृतदेह कुंभार्ली घाटामध्ये नेऊन खोल दरीत फेकून दिला. दरम्यान या हत्येतील आरोपी प्रदीप सुर्वे यासह इतरांना कराड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.   

टॅग्स :MurderखूनGhatkoparघाटकोपरPoliceपोलिसArrestअटक