शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

खून प्रकरणातील आरोपी जेरबंद, पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:13 IST

रुळे (ता. वेल्हा) येथील सागर खंडू निवंगुणे (वय ३२) या तरुणाच्या पूर्व वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणातील फरारी झालेल्या ४ आरोपींना रविवारी (दि. २३) पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

मार्गासनी - रुळे (ता. वेल्हा) येथील सागर खंडू निवंगुणे (वय ३२) या तरुणाच्या पूर्व वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणातील फरारी झालेल्या ४ आरोपींना रविवारी (दि. २३) पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. गुन्हा घडल्यानंतर ४८ तासांत आरोपींना जेरबंद केल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.दिनांक २१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वा. मौजे रुळे (ता. वेल्हे) येथील पिंगारा हॉटेलमध्ये आरोपी नवनाथ धाकू उघडे याची पत्नी, माजी सरपंच छाया उघडे या रुळे गावच्या सरपंच असताना ग्रामपंचायतीच्या कारभारात झालेला गैरव्यवहार आणि आर्थिक घोटाळा रोहिदास शेजवळ याने उघडकीस आणल्यामुळे त्यांच्यात भांडणे होऊन यापूर्वी तक्रारी दाखल झाल्या होत्या. यातील मयत सागर खंडू निवंगुणे हा रोहिदास शेजवळ याचा मित्र असून, त्याने ग्रामपंचायतीचा घोटाळा उघडकीस आणण्यास मदत केली होती. याचा राग मनात धरून आरोपी व त्याच्या साथीदारांनी कट रचून रामदास बबन निवंगुणे व सागर खंडू निवंगुणे हे दोघे जण पिंगारा हॉटेलमध्ये बसले असताना जीपमधून येऊन सागर निवंगुणे याच्या डोक्यात तलवारीने वार करुन त्याचा खून केला. रामदास निवंगुणे यांनी याबाबत फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा घडल्यापासून आरोपी हे फरार झाले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरु, दिलीप जाधवर, दयानंद लिमण, चंद्रकांत झेंडे, जगदीश शिरसाट, राजू चंदनशिव, महेश गायकवाड, नीलेश कदम, अक्षय जावळे यांचे पथक कार्यरत झाले होते. रुळे व परिसरातील गावांमध्ये साध्या वेशात फिरुन आरोपींची माहिती घेत असताना गुन्ह्यातील मुख्य आरोपी हे सिंहगड रोडने जाणार असल्याची माहिती मिळाल्याने किरकटवाडी येथे सापळा रचून सी.डब्लू.पी.आर.एस. गेटसमोर आरोपी शंकर कोंडिबा उघडे (वय २५, रा.रुळे विठ्ठलवाडी ता.वेल्हे जि.पुणे), रवींद्र बाळू आखाडे (वय ३५, रा.नांदोशी ता.हवेली जि.पुणे), रोहित शंकर पासलकर(वय १९, रा.रुळे मोरदरी ता.वेल्हे जि.पुणे),विष्णू ऊर्फ इशा रामभाऊ उघडे (वय १८, रा.रुळे, विठ्ठलवाडी, ता.वेल्हे जि.पुणे) यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी पूर्वीचे भांडणावरुनच सागर निवंगुणे याच्या डोक्यात तलवार, कोयता व कटावणीने वार करुन त्याचा खून केल्याची कबुली दिली आहे.माजी सरपंच छाया उघडे या रुळे गावच्या सरपंच असताना ग्रामपंचायत कारभारातील गैरव्यवहार रोहिदास शेजवळ याने उघडकीस आणल्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली होती.मयत सागर निवंगुणे यांनी शेजवळ यांना घोटाळा उघडकीस आणण्यास मदत केली होती. याचा राग मनात धरून आरोपी व त्याच्या साथीदारांनी कट रचून रामदास बबन निवंगुणे व सागर खंडू निवंगुणे हे दोघे जण पिंगारा हॉटेलमध्ये बसले असताना जीपमधून येऊन त्यांच्यावर हल्ला केला. त्यात सागर मरण पावला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी