शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध महिलेची हत्या, बेपत्ता मुलावर पोलिसांचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 01:59 IST

धारदार शस्त्राने वार करुन राहत्या घरात वृध्देच्या हत्येची घटना सोमवारी सकाळी घणसोलीत घडली आहे.

नवी मुंबई : धारदार शस्त्राने वार करुन राहत्या घरात वृध्देच्या हत्येची घटना सोमवारी सकाळी घणसोलीत घडली आहे. पहाटे पती कामानिमित्ताने घराबाहेर गेले असता हा प्रकार घडला आहे. मात्र या घटनेनंतर त्याच इमारतीत राहणारा मयत महिलेचा मुलगा बेपत्ता असल्याने त्याच्यावर संशय व्यक्त होत आहे.घणसोली येथील घरोंदा वसाहतीमधील सिध्दीविनायक सोसायटीच्या ए/१३ क्रमांकाच्या इमारतीमध्ये हा प्रकार घडला आहे. तिथे राहणारया चंद्रकला भय्ये (६०) यांचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला. पती यशवंत भय्ये यांच्यासह त्या तिथे रहायच्या. तर त्याच इमारतीच्या तिसरया मजल्यावर त्यांचा मुलगा शेखर हा पत्नी व लहान मुलासह रहायला आहे. सोमवारी सकाळी तो दुध आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. परंतु बराच वेळ होवूनही तो परत न आल्याने त्याची पत्नी खालच्या मजल्यावरी सासु सासरयांच्या घरी आली. परंतु दरवाजा ठोकूनही आतुन प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी सासरे यशवंत यांना फोन करुन कळवले. यानुसार ते काही वेळात घरी आले असता, स्वतकडील चावीने त्यांनी दरवाजा उघडला. यावेळी घरात हॉलमध्ये चंद्रकला ह्या रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेल्या असल्याचे आढळून आले. धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या करण्यात आलेली होती. सदर घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीसांसह गुन्हे शाखा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या चौकशीत मयत वृध्द महिला चंद्रकला यांचा मुलगा शेखर हा सकाळपासून बेपत्ता असल्याचे समोर आले. यामुळे पोलीसांनी सोसायटीतले सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तो स्वतच्या हातांकडे निरखून पाहत सोसायटीमधून बाहेर जाताना दिसून येत आहे. शिवाय त्याचा मोबाईल फोनही बंद असल्याने संशय व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई