शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या, ९ तास आरोपी मृतदेहासोबत राहिला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 19:55 IST

पोलिसांनी गेट तोडले तेव्हा २२ वर्षीय महिला बेशुद्ध पडली होती. पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तपासून महिलेला मृत घोषित केले.

नवी दिल्ली - श्रद्धा वालकर हत्या प्रकरण अजून ताजे असतानाच दिल्लीतील सरिता विहार परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आरोपी युवक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या करून मृतदेह घरात डांबून फरार झाला. फरार होण्यापूर्वी त्याने सुमारे नऊ तास मृतदेहासोबत घालवले. एवढेच नाही तर दोन दिवस तो महिलेचा मृतदेह पाहण्यासाठी रात्री घरी येत होता. आरोपीने महिलेची हत्या तिच्या एक वर्षाच्या मुलीसमोर केली. 

हत्या केल्यानंतर आरोपीनं त्या मुलीला सोबत घेतले. महिलेचे कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. राहुल वर्माला महिलेशी लग्न करायचे होते. सरिता विहार पोलिसांनी आरोपी तरुणाला पाच दिवसांनंतर अटक केली. दक्षिण-पूर्व जिल्हा पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरिता विहार पोलिसांना १२ नोव्हेंबर रोजी दुपारी २.२५ वाजता कॉल आला. मदनपूर खादर येथील एका घरात एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडली असून घराला बाहेरून कुलूप असल्याची माहिती मिळाली. माहितीनंतर एसीपी जगदेव सिंग यांच्या देखरेखीखाली निरीक्षक ज्ञानेंद्र राणा, एसआय दीपक धांडा, एएसआय लियाकत अली आणि एएसआय रमेश कुमार यांच्या पथकाने घटनास्थळी जात तपास सुरू केला.

पोलीस पथकाला घटनास्थळी घरमालक परम बिधुरी हा भेटला. घराला बाहेरून कुलूप होते. पोलिसांनी गेट तोडले तेव्हा २२ वर्षीय महिला बेशुद्ध पडली होती. पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तपासून महिलेला मृत घोषित केले. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नव्हत्या. परमने सांगितले की, २० दिवसांपूर्वी राहुल त्याच्या घरात भाड्याने राहायला आला होता. राहुलने त्याला फोन करून त्याची महिला मैत्रिण गुलशना घरात मृतावस्थेत पडल्याचे सांगितले होते. त्यावर पोलिसांनी राहुलचा भाऊ प्रवीण याच्याशी संपर्क साधला. राहुलचे कुटुंबही मदनपूर खादर येथे राहते. प्रवीणने सांगितले की, राहुल एका महिलेसोबत २० दिवसांपासून सहमतीने रिलेशनशिपमध्ये राहत होता. महिलेला एक वर्षाची मुलगीही आहे.

पोस्टमॉर्टममध्ये महिलेची हत्या झाल्याचे उघडगुलशनाने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूची कारवाई केली. एसआय दीपक धांडा यांनी एम्समध्ये महिलेचे पोस्टमार्टम केले. त्यानंतर गुलशनाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट झाले आहे. यानंतर एसआय दीपक धांडा, एएसआय लायक अली आणि रमेश कुमार यांच्या पथकाने महिलेच्या हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. एसीपी जगदेव सिंग यांनी वैयक्तिकरित्या तपासावर देखरेख केली. तपासाअंती पोलीस पथकाने १६ नोव्हेंबर रोजी राहुलला सरिता विहार जंगलातून त्याला अटक केली.

मृतदेह पाहण्यासाठी रात्री यायचादक्षिण-पूर्व जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राहुलला गुलशनाला संशय होता की तिचे कोणासोबत तरी अफेअर आहे. या मुद्द्यावरून त्यांच्यात रोज भांडण व्हायचे. गुलशनाने त्याच्याकडे पाच हजार रुपये मागितले. या मुद्द्यावरून वाद झाला. या भांडणातून १० नोव्हेंबर रोजी दुपारी गुलशनाचा हाताने आणि ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला. यानंतर आरोपी रात्री दहा वाजेपर्यंत महिलेच्या एक वर्षाच्या मुलीसह मृतदेहाजवळ थांबला. रात्री दहा वाजता तो मुलीसह घरातून पळून गेला. त्यानंतर मुलीला दुसऱ्याकडे सोपवून तो पळाला. यानंतर आरोपी रात्री २ वाजता गुलशनाचा मृतदेह पाहण्यासाठी घरी आला. असाच तो २ दिवस येत राहिला. त्यानंतर त्याने घरमालकाला माहिती दिली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी