शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडसोबत मसाज पार्लरला गेला, मध्यरात्री तिथेच संपवला; वरळीत एकाची हत्या, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 12:43 IST

मुंबईच्या वरळी परिसरात ५० वर्षीय व्यक्तीची हत्या, हत्येमागचं गूढ उकलणं पोलिसांसमोर आव्हान 

मुंबई - मायानगरी मुंबई कधीही झोपत नाही असं म्हणतात, रेस्टॉरंट, क्लब यामध्ये रात्रभर पार्ट्या सुरू असतात. परंतु याच मुंबईत मध्यरात्री घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ माजली आहे. २३ जुलैच्या रात्री १२.३० च्या सुमारास मुंबईच्या वरळी नाका परिसरात ५० वर्षीय व्यक्ती २१ वर्षीय गर्लफ्रेंडसोबत मसाज पार्लरमध्ये पोहचला होता. या पार्लरला तो नेहमी यायचा त्यामुळे इथं काम करणाऱ्यांसोबत त्याची चांगली ओळख निर्माण झाली होती. 

या स्पा सेंटरच्या क्लबमध्ये तो त्याचे मित्र आणि गर्लफ्रेंडसोबत बर्थ डे पार्टीसाठी गेला होता. मध्यरात्री पार्टी सुरू होती. दारु प्यायली होती. पार्टी संपवून ते लोक मसाज पार्लरला येतात. काही वेळाने सगळे लोक पार्लर बाहेर पडतात परतु तो व्यक्ती आणि त्याची गर्लफ्रेंड आतमध्येच थांबतात. काही मिनिटांनी २ अज्ञात व्यक्ती मसाज पार्लरमध्ये जाताना दिसतात. त्यानंतर अचानक मोठा आवाज ऐकू येतो आणि हे दोघं बाहेर पडतात. बाहेरचे लोक आतमध्ये जाऊन पाहतात तर ज्या व्यक्तीने थोड्या वेळापूर्वी बर्थ डे पार्टी केली होती तो रक्ताच्या थारोळ्यात दिसून येतो. 

या घटनेची माहिती पोलिसांना कळते, त्यानंतर पोलीस घटनास्थळी येतात. यात मृत झालेल्या व्यक्तीचं नाव गुरुसिद्धप्पा वाघमारे उर्फ चुलबुल पांडे होतं. अखेरच चुलबुल पांडेची हत्या कुणी केली असा सवाल पोलिसांना पडतो. ते अज्ञात २ जण कोण होते, ज्यांनी चुलबुलचा मर्डर करून गायब झाले या सर्वांची उत्तरे पोलीस शोधत होती. तपासात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवला. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. त्यानंतर चौकशीत या व्यक्तीच्या हत्येबाबत धक्कादायक माहिती समोर आली. 

ज्या चुलबुल पांडेची हत्या झाली तो एक हिस्ट्रीशीटर होता. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्यावर बलात्कार, धमकी देणे आणि हत्येचा प्रयत्न यासारखे १० गंभीर गुन्हे दाखल होते. चुलबुल हा स्वत:ला पोलिसांचा खबरी आणि आरटीआय कार्यकर्ता असल्याचं सांगायचा. १७ जुलैला त्याचा बर्थ डे होता. मंगळवारी रात्री तो सॉफ्ट टच स्पाला पोहचला. त्याठिकाणी काम करणाऱ्यांनी त्याच्याकडे बर्थ डे पार्टी मागितली. मध्यरात्री २.३० च्या सुमारास चुलबुलची हत्या झाल्याचं बोललं जातंय. 

सुपारी देऊन हत्या की आणखी काही...

गुरुवारी या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा आरोपी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा इथला आहे. सुरुवातीच्या तपासात सुपारी घेऊन चुलबुलची हत्या केल्याचं समोर आलं आहे. सध्या सक्षम पुरावे आणि तपास करणं बाकी आहे. पोलीस या प्रकरणी गर्लफ्रेंड, स्पा सेंटरच्या ३ लोकांची चौकशी करत आहेत ज्यांच्यासोबत त्याने अखेरची बर्थ डे पार्टी केली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ६ पोलीस पथके नेमण्यात आली आहेत. सर्व अँगलने या घटनेची चौकशी केली जात आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी