शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

चक्कर येऊन डोक्यावर पडल्याचा बनाव; धाकट्याने मोठ्या भावाचा खून केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 20:28 IST

बलवडी (भा.) येथील घटना : संशयित विनोद याने वैभव यास उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी संशयित विनोद याने वैभव याला चक्कर येऊन तो दगडावर आपटल्याने जखमी झाल्याचे डॉक्टरांना सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क -विटा : घरगुती किरकोळ वादातून दारू पिऊन शिवीगाळ केल्याच्या रागातून नारळ सोलण्याचा लोखंडी सुळका डोक्यात घालून धाकट्या भावाने थोरल्या भावाचा निर्घृण खून केला. घटना खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) येथील वेताळबा वस्तीवर गुरूवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. वैभव अर्जुन पवार (वय ३८, रा. बलवडी-भा.)असे मृत झालेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी विटा पोलिसांनी विनोद अर्जुन पवार (वय २४) या धाकट्या भावास अटक केली आहे.

बलवडी (भा.) येथील वेताळबा वस्तीवर वैभव व विनोद पवार हे दोघे सख्खे भाऊ कुटुंबियांसह राहण्यास आहेत. गुरूवारी रात्री विनोद पवार याचा थोरला भाऊ वैभव हा दारू पिऊन आल्यानंतर त्याने घरगुती किरकोळ कारणावरून विनोद यास शिवीगाळ केली. याचा राग आल्याने विनोद याने घराच्या अंगणात असलेले नारळ सोलण्याचे लोखंडी मशीन उचलून दोन ते तीन वेळा वैभव याच्या डोक्यात मारून त्यास गंभीर जखमी केले.

त्यानंतर संशयित विनोद याने वैभव यास उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी संशयित विनोद याने वैभव याला चक्कर येऊन तो दगडावर आपटल्याने जखमी झाल्याचे डॉक्टरांना सांगितले. परंतु, उपचारापूर्वीच वैभव याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच पोलीस उपअधिक्षक पद्मा कदम व पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.  यावेळी संशयित दारू पिऊन शिवीगाळ केल्याने संशयित विनोद याने वैभव पवार याच्या डोक्यात नारळ सोलण्याची लोखंडी मशीन घालून त्याचा खून केल्याची माहिती उजेडात आली. याप्रकरणी मयत वैभव याची आई अलका पवार यांनी विटा पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित विनोद पवार यास पोलीसांनी अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी