शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
4
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
5
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
6
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
7
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
8
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
9
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
10
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
11
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
12
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
13
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
14
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
15
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
16
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
17
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
18
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
19
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
20
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Murder Mystery : खुनाचे गूढ उकला अन् मिळवा 18 कोटी रुपयांचे बक्षीस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 11:12 IST

Murder Mystery : वकिलाच्या खुनाचे गूढ (Murder Mystery) उकलण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीला 18 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका वकिलाच्या खून प्रकरणाचा (Murder Case) तपास गेल्या 20 वर्षांपासून अद्याप लागला नाही. दोन दशकांपूर्वीच्या या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बक्षिसाची रक्कम 2.5 मिलियन डॉलर (18 कोटी रुपयांहून अधिक) करण्यात आली आहे. वकिलाच्या खुनाचे गूढ (Murder Mystery) उकलण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीला 18 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. (Murder Mystery Solve 18 Crore Rupees Reward Prosecutor Who Was Shot Dead 20 Years Ago Case)

दरम्यान, वॉशिंग्टनमध्ये Seattle फेडरल प्रॉसीक्युटरच्या हत्येशी संबंधित दोन दशके जुन्या प्रकरणाचा तपास करण्यास अपयश आल्यानंतर फेडरल तपास अधिकाऱ्यांनी (Federal Investigators)बक्षिसाची रक्कम 18 कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी बक्षीस रक्कम 11 कोटी होती. 

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, 49 वर्षीय थॉमस वेल्स यांची 11 ऑक्टोबर 2001 रोजी त्यांच्या घरी अज्ञात व्यक्तीने गोळ्या घालून हत्या केली होती. 2001 मध्ये झालेल्या या हत्येबाबत अद्याप कोणतीही ठोस पुरावा मिळालेली नाही. त्यानंतर बक्षीस रक्कम वाढवण्याची घोषणा करण्यात आली. वॉशिंग्टनच्या पश्चिम जिल्ह्याचे यू. एस. अ‍ॅटर्नी निकोलस ब्राउन यांनी एका कार्यक्रमात बक्षीस वाढवण्याची घोषणा केली, ज्यामध्ये न्याय विभागाकडून 2 मिलियन डॉलर्स आणि पूर्व अमेरिकी अॅटर्नीचे नॅशनल असोसिएशनकडून अतिरिक्त 500,000 डॉलर देऊ केले आहे.

'न्याय विभाग अजूनही तपासासाठी कटिबद्ध'फॉक्स 13 च्या माहितीनुसार, निकोलस ब्राउन एका कार्यक्रमात म्हणाले, "या गुन्ह्यासाठी वीस वर्षे खूप जास्त आहेत. अमेरिकन न्याय व्यवस्थेकडून या प्रकारणाचा तपास अद्यापही लागला नाही. दोन दशके उलटली असली तरी न्याय विभाग अजूनही या तपासासाठी कटिबद्ध आहे." दरम्यान,  निकोलस ब्राउन हे या खून प्रकरणात सहावे वकील आहेत आणि त्यांचा असा विश्वास आहे की, या प्रकरणाचा 'नवीन दृष्टीकोन' तपासात मदत करू शकतो. जर या हत्येबद्दल कोणाला काही माहिती असेल, तर ते त्यांना पुढे येण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू शकतात.

हल्ल्याचे 'हे' कारण असू शकते...सिएटल टाइम्सच्या वृत्तानुसार, एफबीआयने बराच काळानंतर या सिद्धांतावर विश्वास ठेवला आहे की, ज्या पायलटवर वकील थॉमस वेल्स यांनी आधी  फसवणुकीसाठी खटला चालवला होता, त्याने त्यांना ठार मारण्यासाठी एक शूटर हायर केला होता. थॉमस वेल्स हे ड्रग्स तस्करी प्रकरणात वकील देखील होते, हे देखील त्याच्यावरील हल्ल्याचे कारण असू शकते. पण सत्य काय आहे, ते अद्याप समोर आले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmericaअमेरिका