शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचा प्रेमसंबंधातून ओढणीने गळा दाबून खून, पोलिसांनी काही तासांतच आरोपीला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 00:02 IST

तरुणीचा ओढणीने गळा दाबून खुन करणा-यास पोलिसांनी काही तासात अटक केली़ प्रेमसंबंधातील भांडणातून रागाच्या भरात त्याने खुन केल्याचे उघडकीस आले आहे.

 पुणे - लोहगाव येथील फॉरेस्ट पार्क येथील जंगलात तरुणीचा ओढणीने गळा दाबून खुन करणा-यास पोलिसांनी काही तासात अटक केली़ प्रेमसंबंधातील भांडणातून रागाच्या भरात त्याने खुन केल्याचे उघडकीस आले आहे.उमा बबन कापसे (वय १८, रा़  खुळेवाडी विमाननगर) असे या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी परमेश्वर बोवाळ (वय १९, रा़ बोराडेवस्ती, चंदननगर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी, उमा कापसे आणि परतेश्वर यांच्यात पूर्वीपासून प्रेमसंबंध होते़ परंतु, परमेश्वरच्या व्यसनाला उमाचा विरोध होता़ त्यामुळे त्यांच्यात नेहमी वादावादी होत असे़ त्यात उमा हिची दौंड येथील एका युवकाबरोबर ओळख झाली होती़ परमेश्वरला ते आवडत नव्हते़ त्यामुळे त्यांच्यात नेहमी वादावादी सुरु होती़ परमेश्वरने त्या युवकाची माहिती काढली व त्याला उमाला भेटू नकोस अशी दमदाटी केली होती़ परमेश्वर याने त्याला बुधवारी भेटायला बोलावले होते़ पण तो काही आला नाही़ त्याऐवजी त्याला उमा भेटली़ त्याने उमाला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून दुचाकीवरुन लोहगाव येथील फॉरेस्ट पार्कला घेऊन जाऊ लागला़ ते दुचाकीवरुन जात असताना त्या युवकाचा उमाला फोन आला़ त्यावरुन त्यांच्यात पुन्हा वाद झाला़ रागाच्या भरात परमेश्वरने उमाच्याच ओढणीने तिचा गळा आवळला़ त्यात तिचा मृत्यु झाला़ हे पाहून परमेश्वर पळून गेला़ फॉरेस्ट पार्कमध्ये तरुणी पडली असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना दुपारी अडीचच्या सुमारास लोकांनी कळविली़ याची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळी भेट दिली़ उमा हिची ओळख पटल्यावर गावडे यांनी चंदननगर, येरवडा, विमानतळ पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या़ चंदननगर पोलिसांनी गाडी नंबरवरुन त्याला रात्री ताब्यात घेतले़ विमानतळ पोलिसांनी त्याला अटक केली असून खुनाची माहिती मिळाल्यानंतर काही तासात आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे़

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी