शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधास अडसर असलेल्या पतीची हत्या; पत्नीसह चौघांवर आरोप निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 18:06 IST

हत्या केल्यानंतर कटरने केले मृतदेहाचे तुकडे : एका संशयिताचा माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज

ठळक मुद्देआपल्या मित्रांच्या मदतीने अत्यंत थंड डोक्याने खून करुन नंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा आरोपसोळंकीचाही माफीचा साक्षीदारसाठी केलेला अर्ज न्यायालयासमोर प्रलंबित असून उद्या 27 सप्टेंबर रोजी या दोन्ही अर्जावर न्या. पाटकर यांच्यासमोर युक्तीवाद होणार आहे.या चारही संशयितांविरोधात भा. दं. सं. च्या 302 (खून), 120-ब (कटकारस्थान) व 201 (पुरावे नष्ट करणो) या कलमाखाली आरोप निश्चित केले.

मडगाव - आपल्या अनैतिक संबंधात व्यत्यय येत असल्यामुळे आपला पती बसुराज बारकी याचा आपल्या मित्रांच्या मदतीने अत्यंत थंड डोक्याने खून करुन नंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा आरोप असलेल्या कल्पना बारकी व तिचे अन्य तीन मित्र पंकज पवार, सुरेश सोळंकी व अब्दुल शेख यांच्या विरोधात दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी आरोप निश्चित करुन घेतले असून या प्रकरणात आपल्याला माफीचा साक्षीदार म्हणून सवलत मिळावी यासाठी अब्दुल शेख या आरोपीने न्यायालयात अर्ज केला आहे. या खून प्रकरणातील पाचवा संशयित अल्पवयीन असल्याने त्याच्यावरील खटला बाल न्यायिक मंडळासमोर चालणार आहे.अंगावर शहारे आणणारा हा खून मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात झाला होता. संशयित कल्पना हिचे पंकज, सुरेश व अन्य एकाशी अनैतिक संबंध होते. या संबंधात तिच्याकडून बाधा येत होती त्यामुळे आपल्या या मित्रांना घरी बोलावून दारुच्या नशेत असलेल्या आपल्या पतीचा दोरीने गळा आवळून खून करुन नंतर कटरने त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते जंगलात फेकून देण्याचा आरोप या सर्वावर आहे. या चारही संशयितांविरोधात भा. दं. सं. च्या 302 (खून), 120-ब (कटकारस्थान) व 201 (पुरावे नष्ट करणो) या कलमाखाली आरोप निश्चित केले.वास्तविक या प्रकरणात यापूर्वी सुरेश सोळंकी याला माफीचा साक्षीदार करण्यात आले होते. मात्र या खूनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा दावा करुन अन्य एक संशयित अब्दुल शेख याने मुंबई उच्च न्यायालयात या सवलतीला आव्हान दिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने आरोप निश्चिती केल्यानंतर माफीचा साक्षीदार ही सवलत देण्यासंदर्भात नव्याने निर्णय घ्यावा असे नमूद करुन पुन्हा हा खटला सत्र न्यायालयाकडे पाठविला होता.पोलिसांच्या आरोपपत्रप्रमाणो, अब्दुल शेख याने केवळ मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इतर संशयितांना मदत केली होती. त्याचा फायदा घेऊन शेख याने आपल्याला माफीचा साक्षीदार करावा असा अर्ज केला आहे. सोळंकीचाही माफीचा साक्षीदारसाठी केलेला अर्ज न्यायालयासमोर प्रलंबित असून उद्या 27 सप्टेंबर रोजी या दोन्ही अर्जावर न्या. पाटकर यांच्यासमोर युक्तीवाद होणार आहे.

टॅग्स :MurderखूनCourtन्यायालयPoliceपोलिस