शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मडगावात दिवसाढवळय़ा सराफाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 18:32 IST

हल्लेखोर फरार, व्यापारीवर्गात भितीचे वातावरण

मडगाव: मडगावात आज बुधवारी दिवसाढवळय़ा एका सराफाचा खून करण्याची खळबळजनक घटना घडली. स्वप्नील वाळके असे मयताचे नाव असून, भाजपाच्या राज्य कार्यकारणीच्या सदस्या कृष्णी वाळके यांचा तो मुलगा होता. येथील ग्रेस चर्चच्या मागच्या बाजूला वाळके यांचे कृष्णी ज्वेलर्स नावाचे आस्थापन असून, दुपारी बारा वाजता या आस्थापनात दोघेजण आत शिरले, त्यांच्याकडे रिव्हॉलवर व चाकूही होता. चाकूने वार केल्याने स्वप्नील हा गंभीर जखमी झाला. हल्ला केल्यानंतर संशयिताने पळ काढला.

जखमी अवस्थेत स्वप्नील याला 108 मदतसेवेच्या अॅम्बुलन्समधून हॉस्पिसियोत दाखल केले असता, त्याला मरण आले. दिवसाढवळय़ा घडलेल्या या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. हल्लेखोरांना त्वरीत अटक करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.दिवसाढवळय़ा घडलेल्या या खूनी हल्ल्यामुळे व्यापारी वर्गातही भितीचे वातावरण पसरले आहे.

हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने या सराफी दुकानात आत शिरले व नंतर स्वप्नीलने त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर खुनी हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.संशयिताने हल्ला केल्यानंतर ते पळून गेले. यातील एकाच्या हाती चाकू होता. सराफी दुकानातून मोठमोठय़ाने आवाज ऐकू आल्यानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमले. मात्र एक हल्लेखोर हातात चाकू घेऊन असल्याने त्याला पकडण्यासाठी पुढे सरसावण्यासही ते घाबरले. लोकांनी त्याच्यावर दगडही फेकले, त्याही अवस्थेत तो पळून गेला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक पंकजकुमार सिंग हेही घटनास्थळी दाखल झाले. भादंसंच्या 302 कलमाखाली मडगाव पोलिसांनी खून म्हणून हे प्रकरण नोंदवून घेतले असून, संशयितांचा शोध चालू असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक पंकजकुमार सिंग यांनी दिली.दरम्यान, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी गोवा राज्यात कायदा व सुव्यवस्था पुर्णपणो कोसळल्याचे हे ज्वलंत उदाहरण असल्याचे सांगताना खुन्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे.

भाजपा गोवा प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी या खूनी हल्ल्याचा निषेध केला असून, मडगाव पोलिसांनी त्वरीत कारवाई करुन संशयितांना अटक करावी अशी मागणी केली आहे. मडगावचे नगरसेवक रुपेश महात्मे यांनीही दिवसाढवळय़ा घडलेल्या या घटनेचा निषेध करताना संशयितांना त्वरीत गजाआड करावे अशी मागणी केली आहे.

 

टॅग्स :Murderखून