शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

घणसोलीतील मुलाच्या हत्येचा उलगडा; अल्पवयीन मुलीने दिली गुन्ह्याची कबुली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:11 IST

घणसोली गाव येथे राहणाऱ्या ॐकार साठे (४) याच्या हत्येची घटना १८ सप्टेंबरला घडली होती. तो घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता.

नवी मुंबई : घणसोली येथे चार वर्षीय मुलाच्या हत्येची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी शेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात रवानगी केली आहे. अनपेक्षितपणे हातून ही घटना घडल्याचे तिने पोलिसांना सांगितले. 

घणसोली गाव येथे राहणाऱ्या ॐकार साठे (४) याच्या हत्येची घटना १८ सप्टेंबरला घडली होती. तो घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. काही तास शोधाशोध केल्यानंतर घराच्या मागेच गोणीत त्याचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर गुन्ह्याची उकल करण्यासाठी रबाळे पोलिसांनी कंबर कसली होती. दरम्यान, ॐकारला ज्या गोणीत गुंडाळले होते, त्या गोणीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. या वेळी तशाच प्रकारची गोणी ॐकार  राहत असलेल्या इमारतीमध्येच एका घरात आढळून आली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, उमेश गवळी यांनी तपासाची दिशा ठरवली. ज्या घरात ही गोणी सापडली, घटनेवेळी त्या घरात १७ वर्षांची मुलगी एकटीच होती. परंतु पोलिसांनी विश्वासात घेऊनदेखील ती तपासात सहकार्य करीत नव्हती. अखेर पोलीस निरीक्षक गोरे यांनी सातत्याने त्या मुलीकडे चौकशी करून तिला विश्वासात घेतले असता, २३ दिवसांनी तिने गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, ॐकारसोबत तिच्या घरात नेमके घडले काय? यावरचा पडदा तिने उलगडलेला नाही. 

बालसुधारगृहात रवानगीॐकार हा नेहमी तिच्या घरी खेळायला जात असे. घटनेच्या दिवशीही तो तिच्या घरी असताना अचानक बेशुद्ध पडला. यामुळे भयभीत झालेल्या या मुलीने त्याला गोणीत बांधून घराच्या मागच्या बाजूच्या खिडकीतून खाली फेकले. यामध्येच त्याचा गुदमरून मृत्यू झाला. मात्र तो बेशुद्ध कशाने झाला याचा उलगडा होऊ शकलेला नाही. तर तिने गुन्ह्याची कबुली देताच मंगळवारी तिला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठविण्यात  आले आहे. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस