शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

डोक्यात गोळी झाडून खून; मित्राच्या मदतीनेच काढला सख्ख्या भावाचा काटा...

By राजकुमार जोंधळे | Updated: February 11, 2023 21:11 IST

पोलिसांनी सांगितले की, लातूर तालुक्यातील भातखेडा येथील सूरज गोविंद मुळे (वय २५) हा कुटुंबातील आई, बहीण आणि भावाला दारू पिऊन सतत छळत होता.

लातूर : कुटुंबीयांचा सतत छळ करणाऱ्या सख्ख्या भावाचा मित्राच्या मदतीने डोक्यात गोळी झाडून गेम केल्याची माहिती तपासात समोर आली. यातील मित्राला लातूर पोलिसांनी पिस्टल, मोटारसायकलसह अटक केली असून, अटकेतील दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, लातूर तालुक्यातील भातखेडा येथील सूरज गोविंद मुळे (वय २५) हा कुटुंबातील आई, बहीण आणि भावाला दारू पिऊन सतत छळत होता. दरम्यान, या छळाला कंटाळून भाऊ धीरज हा आई-बहिणीला घेऊन पुण्याला गेला होता. तेथे त्याने सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी स्वीकारली होती. दरम्यान, दारुडा भाऊ सतत आपल्याला छळत असल्याचा राग मनात खदखदत होता. त्यातच त्याने सख्ख्या भावाचा गेम करण्याचा कट पुण्यात रचला. त्यासाठी गावठी बनावटीचे पिस्टल त्याने खरेदी केले. 

भातखेडा येथील घरात सूरजवर पाळत ठेवण्याची, रेकी करण्याची जबाबदारी त्याने मित्र अमर अशोक गायकवाड (२२) याच्यावर सोपविली. पाळत ठेवून सोमवारी (दि. ६ फेब्रुवारी) रात्री पुण्यातून तो लातुरात आला. मित्र अमर गायकवाड याची मोटारसायकल घेऊन ते दोघेही भातखेडा येथे आले आणि भाऊ धीरज याने झोपेत असलेल्या सूरजच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर तो पुन्हा रातोरात पुण्याला निघून गेला. गुन्ह्यात वापरलेले पिस्टल हे मित्राच्या घरी लपविल्याचे पोलिस तपासात समोर आले. पुण्यातून पिस्टल आणि लातुरातून मित्र अमर अशोक गायकवाड याला मोटारसायकलसह अटक केली आहे.

मित्र म्हणून दिली अमर गायकवाडने साथ...कट रचण्यापासून ते फत्ते करण्यापर्यंतची माहिती धीरजने मित्र अमर गायकवाडला दिली असून, मैत्रीपाेटी अमरने साथ दिली. गुन्ह्यात वापरण्यासाठी दुचाकी दिली. गाोळी झाडण्यासाठी धीरज घरात शिरला, त्यावेळी अमर बाहेर देखरेख करत हाेता. खून झाल्यानंतर पुन्हा धीरजला लातुरात आणून साेडण्याचे कामही अमरने केले, असे पोलिसांनी सांगितले.

सोयरिकीसाठी म्हणून धीरजने घेतली रजा...आरोपी धीरज हा पुण्यातील एका खासगी सुरक्षा एजन्सीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामावर होता. स्वत:चे लग्न जमविण्यासाठी गावाकडे जायचे आहे, असे सांगत त्याने रजा घेतली होती. रात्रीतून पुणे येथून लातूरला आला. मित्र अमरच्या मदतीने सख्खा भाऊ सूरजच्या डाेक्यात गाेळी झाडली. गुन्ह्यातील गावठी पिस्टल पुण्यातील एका मित्राच्या घरात काेणतीही माहिती न देता ठेवले, असेही पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी