शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये धारदार शास्त्राने वार करून मनपा कर्मचाऱ्याचा खून

By अझहर शेख | Updated: May 1, 2024 14:25 IST

घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी पोलीस ठाण्याचे फिरते गस्ती पथके व पोलीस अधिकारी यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

नाशिक : शहर व परिसरामध्ये खुनाची मालिका सुरूच आहे. मंगळवारी (दि.३०) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गोदाकाठावरील बालाजी कोट या ठिकाणी मनपा कर्मचारी सनी जॉन मायकल (३६,रा.बोधलेनगर) याचा धारदार शास्त्राने वार करून खून करण्यात आला. रक्तबंबाळ अवस्थेत सनी ला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता असे पोलिसांनी सांगितले.

सनी आपल्या मित्रांसोबत दुचाकीने पान टपरीवर जात होता. यावेळी समोरून येणाऱ्या एका दुचाकीला सनीच्या गाडीचा या धक्का लागला. यावरून सनी चे मित्र व समोरील दुचाकीस्वार यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हे दोघे पण दुकानावर पुन्हा भेटले त्या ठिकाणी पुन्हा शाब्दिक वाद झाला. यानंतर त्यांनी आपल्या मित्रांना बालाजी कोट या ठिकाणी दारू पिण्यासाठी बोलावून घेतले. तेथे अज्ञात टोळके आले त्यांनी सनी वर धारधार शस्त्राने हल्ला केला. पोटात वर्मी घाव लागल्याने गंभीरपणे जखमी होऊन तो मृत्युमुखी पडला. 

घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी पोलीस ठाण्याचे फिरते गस्ती पथके व पोलीस अधिकारी यांचा  फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तातडीने रक्तबंबाळ सनी ला शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीरपणे जखमी झाल्याने त्यास वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात होता.

सनी हा सातपूर मनपा विभागीय कार्यालयातील अतिक्रमण विभागात नोकरीला होता त्याचा अचानकपणे अशा पद्धतीने धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याने बोलले नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच शासकीय जिल्हा रुग्णालयात सनीचे मित्रपरिवार व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी