शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या कंत्राटी डॉक्टरला अटक, सहकारी डॉक्टरचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 09:34 IST

दिंडोशी पोलिसांनी अटक केलेल्या डॉक्टरचे नाव सुशांत कदम असे असून त्याच्यावर आरोप करणाऱ्या महिला डॉक्टर यांना ते ओळखतात.

मुंबई : दिंडोशी पोलिसांनी पालिकेच्या कंत्राटी डॉक्टरला बुधवारी अटक केली आहे. त्याने त्याच्या सहकारी महिला डॉक्टरचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याचा त्याच्यावर आरोप असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिंडोशी पोलिसांनी अटक केलेल्या डॉक्टरचे नाव सुशांत कदम असे असून त्याच्यावर आरोप करणाऱ्या महिला डॉक्टर यांना ते ओळखतात. ते दोघेही पालिकेचे कंत्राटी डॉक्टर असून त्यांनी सोबत काम केले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम आणि पीडित डॉक्टरमध्ये काही आर्थिक व्यवहार झाले होते. त्यावरून पुढे त्यांच्यात वाद झाले. तेव्हा डॉक्टरने पीडितेबाबत परिचितांकडे अश्लील भाषेत बोलण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर त्याने तिचे आक्षेपार्ह फोटोही व्हायरल केले. 

ही बाब पीडितेला समजल्यानंतर तिने दिंडोशी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांनी महिला डॉक्टराचा लैंगिक छळ आणि धमकी दिल्याप्रकरणी कदम याच्यावर कलम ३५४ (ए) (३), ५००, ५०४,५०६,५०९  (३) आणि आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करण्यात आली असून एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याने पाठवलेले फोटो मोर्फ आहेत का, याचाही तपास पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी