शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

केरळच्या सीपीएम नेत्याच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा मुंबईत दाखल 

By पूनम अपराज | Updated: June 18, 2019 16:05 IST

पीडित महिलेने बिनॉयविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केला

ठळक मुद्देबिनॉय आणि पीडित महिलेची ओळख डान्स बारमध्ये झाली होती. दोघांना ८ वर्षाचं मुलं देखील आहे. बिनॉयने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

मुंबई - केरळमधील सीपीएम नेते कोडियेरी बालकृष्णन यांचा मुलगा बिनॉयविरोधात बलात्काराचा गुन्हा ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल आहे. दुबईतील एका डान्स बारमध्ये बिनॉयची ओळख पीडित तक्रारदार महिलेशी झाली होती. पीडित महिलेने बिनॉयविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवाड यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. 

ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवाड यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, बिनॉय आणि पीडित महिलेची ओळख डान्स बारमध्ये झाली होती. दोघांना ८ वर्षाचं मुलं देखील आहे. याप्रकरणी भा. दं. वि. कलम ३७६ आणि ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे. दुबईतील एका डान्स बारमध्ये येथे काम करणाऱ्या महिलेची ओळख बिनॉयशी झाली. नंतर त्याचे प्रेमसंबंध जुळेल आणि २०१० साली बिनॉय पीडित महिलेला घेऊन मुंबईला आला आणि पश्चिम उपनगरात भाड्याने घर तिच्यासाठी घेतले. बिनॉयने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या संबंधातून त्यांना ८ वर्षाचं मुल देखील आहे. मात्र, अलीकडच्या काळात बिनॉय तिला सोडून गेला असून टाळाटाळ करत असल्याने पीडित महिलेने बिनॉयविरोधात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. 

 

टॅग्स :Rapeबलात्कारfraudधोकेबाजीPoliceपोलिसKeralaकेरळMumbaiमुंबई