शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दीड किलो सोने, ३५ किलो चांदीच्या शोधात मुंबई पोलीस यवतमाळमध्ये

By सुरेंद्र राऊत | Updated: August 6, 2022 17:19 IST

फसवणुकीचा गुन्हा, यवतमाळातील दोन सराफा व्यावसायिक अडचणीत

यवतमाळ: चाेरी साेन्याची यवतमाळात माेठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. महानगरातील गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल यवतमाळात गाळला जाताे. मुंबईतील लाेकमान्य टिळक मार्ग पाेलिसांचे पथक दीड किलाे साेन व ३५ किलाे चांदीच्या शाेधात शनिवारी यवतमाळात पाेहाेचले. गुन्ह्यातील आराेपीने दाेन सराफांची दुकाने पथकाला दाखविली. यातील एका सराफाला मुंबईच्या पथकाने ताब्यात घेतले. या कारावाईने सराफा बाजारात खळबळ उडाली आहे.

मुंबईत सराफा व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास चार काेटींच्या साेन्याचा अपहार झाल्याचे तक्रारीत आहे. याचा शोध घेतला जात आहे. त्या व्यापाऱ्याच्या नात्यातीलच व्यक्तीने अपहार केला. त्याने हडप केलेले सोने यवतमाळातील दोन सराफा व्यावसायिकांना विकल्याची कबुली दिली. २०२१ पासून आरोपी यवतमाळात सोने व चांदी देत होता. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक व इतर तीन कर्मचाऱ्यांच्या पथकाने तुलसी ज्वेलर्स व लष्करी ज्वेलर्सची झाडाझडती घेतली. त्यात तथ्य आढळून आल्याने एका सराफाला ताब्यात घेवून शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. शनिवारी सकाळपासून ही कारवाई सुरू होती. मुंबई पोलिसांच्या दिमतीला स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी देण्यात आले होते.

प्रकरण निस्तारण्यासाठी आमदारांचा भाऊ पुढे

दोन नंबरच्या व्यवसायात गुंतलेल्या आमदाराच्या भावाने पोलीस पथक सराफाकडे येताच घटनास्थळी धाव घेतली. तेथे त्याने पोलीस अधिकाऱ्याला आमदाराचा भाऊ असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर आमदार साहेबांसोबत बोलून घ्या, प्रकरण येथेच रफादफा करा अशी विनवणी केली. यावर पोलीस अधिकाऱ्याने मी साधा सहायक निरीक्षक आहे. आमदार साहेबांना बोलायचे असेल तर वरिष्ठांशी बोलावे असे सांगून बोलणे टाळले. मात्र त्यानंतरही आमदारांचा भाऊ पूर्णवेळ कारवाई दरम्यान उपस्थित होता. सराफांना सोडविण्यासाठी त्याचा खटाटोप सुरू होता.

कवडीमाेल भावात साेने खरेदी

चाेरीचे साेने अतिशय कवडीमाेल भावात खरेदी केले जाते. त्याची नंतर बाजारभावप्रमाणे विक्री हाेते. या व्यवहारात बक्कळ पैसा मिळत असल्याने काही सराफा पाेलीस कारवाईलाही घाबरत नाही. शिवाय त्यांना स्थानिक राजकारण्यांचे पाठबळ मिळत आहे.  चाेरीचे साेने खरेदी केल्यानंतर एखादा प्रकारणात पाेलीस तपासाकरिता येतात. सराफा खरेदी केलेल्या मुद्देमालासाेबतच दुप्पट रक्कम देवून सुटका करून घेतात. त्यामुळे चाेरट्यांचेही फावत आहे. स्पाॅट सेटींगचा हा प्रकार येथे प्रचलित झाला आहे. पाेलिसांनी मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे फिर्यादीचाही आक्षेप राहत नाही. यातूनच चाेरीचे साेने घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे.  शिवाय शहरासह जिल्ह्यात सातत्याने चोरीच्या घटना होत आहे. सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरीचे सोने खरेदीत स्वीट मार्ट व्यावसायिकाचा मुलगा आरोपी निघाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbai policeमुंबई पोलीसGoldसोनंSilverचांदी