शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यातील 'त्या' अपहृत मुलीची मुंबई पोलिसांनी केली सुटका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 19:00 IST

शाकिर रहीम शेख (वय 24) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो सायन-कोळीवाडा येथे राहतो. विवाहित असलेला शाकिर वेल्डिंगचे काम करतो. शाकिर राहत असलेल्या परिसरात पीडित मुलींचे नातेवाईक राहतात. त्यामुळे दिव्यात राहणाऱ्या मुलींचे सायन कोळीवाडय़ात येणं-जाणं होतं. एक मुलगी 16 तर दुसरी 17 वर्षांची आहे.

मुंबई - दिवा येथे राहणाऱ्या मात्र कधी-कधी सायन-कोळीवाडा येथे नातेवाईकांकडे येणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना शिरढोण येथे एका भाडय़ाच्या खोलीत लपवून ठेवणाऱ्या 24 वर्षीय वेल्डरचा मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष - ४ ने माग काढला आहे. या भामटय़ाला अटक करून मुलींची सुटका केली आहे.

शाकिर रहीम शेख (वय 24) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो सायन-कोळीवाडा येथे राहतो. विवाहित असलेला शाकिर वेल्डिंगचे काम करतो. शाकिर राहत असलेल्या परिसरात पीडित मुलींचे नातेवाईक राहतात. त्यामुळे दिव्यात राहणाऱ्या मुलींचे सायन कोळीवाडय़ात येणं-जाणं होतं. एक मुलगी 16 तर दुसरी 17 वर्षांची आहे. 20 सप्टेंबर रोजी या दोघी गणपती पाहण्यासाठी सायन-कोळीवाडय़ात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर अचानक त्या दोघी गायबच झाल्या. त्यांच्या पालकांनी वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंद केली. त्यानंतर कक्ष - ४ चे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांच्या मार्गदर्शनाखाली मिंटे, बोटे यांच्यासह पथकाने तपास सुरू केला. दोघींपैकी एकीकडे मोबाइल होता. त्यामुळे वाशीमध्ये तिचे शेवटचे मोबाइलचे लोकेशन मिळाले. त्यानंतर वेगवेगळय़ा बाजूने सखोल चौकशी सुरू असताना शाकिरचे नाव पुढे आले. त्यामुळे शाकिरचा शोध सुरू केल्यावर तो पनवेलजवळील शिरढोण गावात असल्याची खबर मिळाली. त्यामुळे पथकाने शिरढोण गाठून शाकिरला ताब्यात घेतल्यावर त्याने तेथे एक खोली भाडय़ाने घेऊन दोन्ही मुलींना त्या ठिकाणी ठेवल्याचे निष्पन्न झाले. मग पोलिसांनी मुलींची सुटका करून शाकिरला बेडय़ा ठोकल्या. शाकिरने वेगवेगळी आमिषे दाखवून त्या मुलींचे स्वतःच्या फायद्यासाठी अपहरण केले होते. आरोपी शाकिरने त्यांना नेमकं कोणत्या कारणासाठी अपहरण केले होते याचा वडाळा टी.टी. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण