शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

समीर वानखेडे हेरगिरीप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांनी चौकशी करून मागवला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 19:50 IST

Sameer Wankhede Spying Case :एनसीबीचे मुंबईतील झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी (Sameer Wankhede) आपल्यावर दोन साध्या वेशातील मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली जात असल्याची तक्रार केली आहे

ठळक मुद्देया तक्रारीनुसार मी अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या पोलिसाला याप्रकरणी चौकशी करण्यास सांगून अहवाल सादर करण्यास सांगितले असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. 

एनसीबीचे मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मुंबईपोलिसांच्या साध्या वेशातील पोलिसांकडून हेरगिरी केल्याप्रकरणी वानखेडे यांनी तक्रार मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे सादर केले आहे. या तक्रारीनुसार मी अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या पोलिसाला याप्रकरणी चौकशी करण्यास सांगून अहवाल सादर करण्यास सांगितले असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. 

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) गेल्या आठवड्यात मुंबईच्या खोल समुद्रात क्रूझवर रेव्ह पार्टी (Cruise Rave Party) करताना पकडण्यात आले होते. यावरून राज्य सरकार आणि एनसीबीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आर्यन खानकडे ड्रग सापडलेले नसताना त्याला अटक करण्यात आली आणि त्यांचे लक्ष्य शाहरुख असल्याचा आरोप राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. यावर आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. (mumbai cruise rave party case)

एनसीबीचे मुंबईतील झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी (Sameer Wankhede) आपल्यावर दोन साध्या वेशातील मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली जात असल्याची तक्रार केली आहे. महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे यांच्याकडे ही तोंडी तक्रार केल्याने खळबळ उडाली. ओशिवारा पोलिसांनी स्मशानात जात असताना समीर वानखेडे यांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. वानखेडे यांच्या आईचे २०१५ मध्ये निधन झाले आहे. तेव्हा पासून ते या ठिकाणी जातात, असे सांगितले जात आहे.  गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांचे पोलीस पाळत ठेवत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली.  

 

 

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbaiमुंबईPoliceपोलिसcommissionerआयुक्त